द्राक्ष, बेदाण्यांवरील बांगलादेशचा आयातकर रद्द करण्याबाबत हालचाली
ज्ञानेश उगले
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

बांगलादेश हा भारतीय द्राक्षांचा महत्त्वाचा ग्राहक आहे. या देशात 100 टक्के आयातकर आकारला जातो. त्यामुळे निर्यात होणारी द्राक्षे व बेदाणे या उत्पादनावरील खर्च वाढतो.
-खासदार हरिश्चंद्र चव्हाण

नाशिक : भारतीय द्राक्षांवर बांगलादेशात आकारल्या जाणाऱ्या आयातकरामुळे तेथील ग्राहकांना त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. भारतीय शेतकरी व व्यापाऱ्यांचेही नुकसान होते. हा आयातकर रद्द होण्याची मागणी राज्य द्राक्ष बागायदार संघाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी प्राधान्याने हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सांगितले.

बांगलादेशातील आयातकर रद्द करण्याबाबत द्राक्ष संघाने यावेळी अनेकदा केंद्राकडे मागणी केली आहे. नुकतीच चव्हाण यांच्यासह द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सूरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीत प्रभू यांनी हा विषय समजून घेत यावर तात्काळ सकारात्मक पाऊल उचलण्यात येईल, असे आश्वासन दिले.

देशातील बहुतांश द्राक्षे व बेदाणे नाशिक, पुणे, सांगली या जिल्ह्यांत होतात. भारतातून निर्यात होणाऱ्या द्राक्ष आणि बेदाण्यावर बांगलादेशात शंभर टक्के आयातकर लावला जातो. ती बांगलादेशात महाग विकली जातात. त्याचा निर्यातीवर परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे यांनी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना निवेदन दिले होते. द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसतो.

त्यामुळे भारत बांगलादेशात द्विपक्षीय चर्चेत हा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी वाणिज्यमंत्री प्रभू यांना केली. यासंदर्भात दक्षिण आशियात मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी भारत नियमितपणे प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने हा प्रश्‍न सोडवू, असे प्रभू यांनी सांगितले.

या बैठकीविषयी माहिती देतांना चव्हाण म्हणाले की, बांगलादेश हा भारतीय द्राक्षांचा महत्त्वाचा ग्राहक आहे. या देशात 100 टक्के आयातकर आकारला जातो. त्यामुळे निर्यात होणारी द्राक्षे व बेदाणे या उत्पादनावरील खर्च वाढतो. व्यापारी व शेतकऱ्यांना हा भुर्दंड बसतो. ग्राहकांच्या मागणीवरही परिणाम होतो. राज्य द्राक्ष बागायतदार संघाने याबाबत अनेकदा माझ्याकडे याबाबत आग्रह धरलेला आहे.

पुणे येथे झालेल्या द्राक्ष संघ मेळाव्यातही याबाबत चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत लक्ष घालून सचिव व अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याचा सर्व स्तरावर पाठपुरावा सुरू असताना त्याचसंदर्भात केंद्रीय मंत्री प्रभू यांच्यासोबत ही सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत विविध पातळ्यांवर हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर लवकरच तोडगा निघेल, असेही खासदार चव्हाण यांनी सांगितले.

बैठकीत खासदार चव्हाण, ऑल इंडिया द्राक्ष निर्यातदार संघाचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले, खजिनदार महेंद्र शाहीर उपस्थित होते.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...