agriculture news in marathi, Movement for the cancellation of promotion of livestock development officials | Agrowon

अकोल्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रद्दसाठी आंदोलन
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 मार्च 2019

अकोला :  शासनाने पशुसंवर्धन विभागात १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररीत्या पदोन्नती दिल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी (ता. १५) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून या धोरणाचा निषेध केला. 

दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना चक्क पशुधन विकास अधिकारी या वर्ग एक पदावर पदोन्नती देऊन पशुवैद्यक डॉक्टर बनविण्याचा अफलातून प्रकार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

अकोला :  शासनाने पशुसंवर्धन विभागात १२५ सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना बेकायदेशीररीत्या पदोन्नती दिल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी (ता. १५) येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी काळ्या फिती बांधून या धोरणाचा निषेध केला. 

दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना चक्क पशुधन विकास अधिकारी या वर्ग एक पदावर पदोन्नती देऊन पशुवैद्यक डॉक्टर बनविण्याचा अफलातून प्रकार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

पशुधन विकास अधिकारी हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येते. यापदावर बढती दिल्यामुळे विद्यमान कार्यरत पशुधन विकास अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

१९८४ च्या भारतीय पशुवैद्यक कायद्यानुसार पशुधन विकास अधिकारी या पदावर सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती बेकायदेशीर असून, ती रद्द करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

 आंदोलनानत डॉ. जयेश गित्ते, डॉ. अाकाश कोलासरकर, डॉ. गजानन लंगोटे, डॉ. प्रतीक जाधव, डॉ. गोविंद खताळ, डॉ. शुभम ठाकरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. पूजा पवार, डॉ. श्वेता मोरखडे, डॉ. अंजली पाटील, डॉ. अंकित राठोड, डॉ. सागर डफडे, डॉ. सतीश हरकाळ, डॉ. पायल राठोड, डॉ. नेहा भावे, डॉ. स्मिता रामटेके आदींनी भाग घेतला.

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...