agriculture news in marathi, Movement of Farmer Steering Committee from March 23 | Agrowon

शेतकरी सुकाणू समितीचे २३ मार्चपासून आंदोलन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासह त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी सहा शेतकरी व शेतमजूर संघटनांच्या राज्य सुकाणू समितीतर्फे २३ मार्च ते ३० एप्रिल या काळात आंदोलन केले जाईल, असा निर्धार मंगळवारी (ता. २०) झालेल्या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बळिराजा संघटनेचे गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, अरुण रामराजे, नाना ठाकरे, लोकसंघर्ष मोर्चाचे काथा वसावे, संजय महाजन, रामसिंग गावीत, दिलीप गावित, करणसिंग कोकणी, विलास गावित, सुभाष काकुस्ते आदी उपस्थित होते.

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासह त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारला जाग आणण्यासाठी सहा शेतकरी व शेतमजूर संघटनांच्या राज्य सुकाणू समितीतर्फे २३ मार्च ते ३० एप्रिल या काळात आंदोलन केले जाईल, असा निर्धार मंगळवारी (ता. २०) झालेल्या बैठकीत करण्यात आला.

या बैठकीत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील, बळिराजा संघटनेचे गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, अरुण रामराजे, नाना ठाकरे, लोकसंघर्ष मोर्चाचे काथा वसावे, संजय महाजन, रामसिंग गावीत, दिलीप गावित, करणसिंग कोकणी, विलास गावित, सुभाष काकुस्ते आदी उपस्थित होते.

किशोर ढमाले म्हणाले, हमीभाव, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे प्रश्‍न व इतर अनेक शेतीप्रश्‍नांबाबत २ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. परंतु ती निष्फळ ठरली. त्यामुळे 'कर, कर्जा नही देंगे'चा नारा दिला जाईल.

रघुनाथदादा म्हणाले, राज्यात १९८६ ते २००० पर्यंत ८६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांचे प्रश्‍न फक्त निवडणुकीत आठवतात. त्यामुळे २३ मार्च रोजी शेतकरी जागर यात्रा निघेल. त्यात विविध भागांत १०० वाहनांमधून फिरून कार्यकर्ते सत्याग्रहींची नोंदणी करतील. तत्पूर्वी १९ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर अन्नत्याग आंदोलन केले, ३० एप्रिलला शेतकरी जेलभरो आंदोलन होईल. मात्र गरज भासल्यास १ जूनपासून शेतकरी संपाचे हत्यार उपसले जाईल, असेही ते म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...
पुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पुणे जिल्ह्यात शेतकरी सन्मान योजनेच्या...पुणे : केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान...
हिंगोलीतील २७ हजार लोकसंख्या पाण्यासाठी...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
खानदेशात चारा प्रश्‍न गंभीरजळगाव ः खानदेशात सद्यःस्थितीत निर्माण झालेल्या...
दुष्काळमुक्त मराठवाड्याचा संकल्प ः...औरंगाबाद: पन्नास टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात...
छपन्न इंचीच्या छातीच्या गप्पा कशाला?ः...चाकण, जि. पुणे: देशाचे पंतप्रधान देश माझ्या मुठीत...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
औरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कृषी क्षेत्रात निर्मिती उद्योगाच्या...अकोला : कृषी क्षेत्रात बायोफर्टिलायजर,...
खानदेशात भुईमूग पीक जेमतेमजळगाव : भुईमुगाचे पीक खानदेशात जेमतेम आहे. त्याचे...
सोलापूर जिल्हा बॅंकेतही मिळणार ‘सन्मान...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा...
लाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...
प्रस्तावित सुरत-हैदराबाद...नाशिक : केंद्राच्या भारतमाला योजनेंतर्गत...
शेवगाव, पाथर्डीत शेळ्या-मेंढ्यांच्या...शेवगाव, जि. नगर : दुष्काळी परिस्थितीत सरकारने...
सांगलीचा प्रश्‍न दिल्लीदरबारीसांगली ः सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला...