agriculture news in marathi, Movement of farmers' boilars of Kadva | Agrowon

शेतकऱ्यांचे ‘कादवा`च्या बॉयलरवर आंदोलन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

निफाड, जि. नाशिक : उसाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कादवा गोदा साखर कारखान्याच्या बॉयलरवर चढून आंदोलन केले. मात्र, प्रशासन आणि संचालक मंडळाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

निफाड, जि. नाशिक : उसाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कादवा गोदा साखर कारखान्याच्या बॉयलरवर चढून आंदोलन केले. मात्र, प्रशासन आणि संचालक मंडळाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

शिंगवे येथील शेतकरी रामकृष्ण डेर्ले, किशोर मोगल, सतीश सानप यांनी बॉयलरवर चढून दिवसभर आंदोलन केले. शेतकी अधिकारी बडे आणि महाव्यवस्थापक कुरू कुलशिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कार्यकारी संचालक पुणे येथे असल्याने कोणताही निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. येत्या आठ दिवसांत धनादेश देतो, अशी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, याबाबत सतत चालढकल होत असल्याने शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले.

निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने शेतकऱ्यांनी पिंपळगाव निपाणी येथील केजीएस साखर कारखान्याला ऊस दिला. फेब्रुवारी, मार्च महिन्यात तोडलेल्या उसाचे पैसे कारखाना व्यवस्थापक मंडळाने दिले नाहीत. त्यासाठी वारंवार आश्वासने देऊन विलंब केला. मागील वर्षाचे जवळपास ३०० शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये थकीत असल्याचे व्यवस्थापकाकडून सांगण्यात येते. शेतकरी मात्र ३५० शेतकऱ्यांचा ७ कोटी रुपये थकीत असल्याचा दावा आहे.

इतर बातम्या
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी...अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही...
निताने येथे वीजवाहक तारांच्या... नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील...
'वसाका'ची चाके पुन्हा फिरणारनाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव''...
‘जानेफळ येथे सोयाबीन पेंड प्रक्रिया...अकोला ः सोयाबीन पेंड प्रक्रिया उद्योग सुरू करून...
अमरावती जिल्ह्‍यात कर्जवाटपात...अमरावती ः जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...नाशिक  : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात...
फुलंब्री तालुक्‍यात चाराटंचाई तीव्र फुलंब्री, जि. औरंगाबाद : सततच्या...
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
जालना जिल्ह्यात शेततळ्यांच्या...जालना : सामूहिक शेततळ्यांचे उद्दिष्ट जालन्याच्या...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा साडेआठशे नगर : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
सांगलीतील आवर्तन बंद होण्याची शक्यतासांगली : वारणा आणि कोयना धरणांतील पाण्याची पातळी...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नांदेड जिल्ह्यात नऊ हजार जमीन...नांदेड  : राष्ट्रीय शाश्वत शेती...
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान :...सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या...
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या...नांदेड : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी विविध...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...