agriculture news in marathi, Movement of farmers on Palkhed dam | Agrowon

पालखेड धरणावर शेतकऱ्यांचा ठिय्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

चिंचखेड, जि. नाशिक : पालखेड धरण समूहातून एक थेंबही पाणी जायकवाडी धरणात जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा निफाड, दिंडोरी आणि येवला येथील शेतकऱ्यांनी दिला. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणावर सोमवारी (ता.२९) ठिय्या आंदोलन केले.

चिंचखेड, जि. नाशिक : पालखेड धरण समूहातून एक थेंबही पाणी जायकवाडी धरणात जाऊ दिले जाणार नाही, असा इशारा निफाड, दिंडोरी आणि येवला येथील शेतकऱ्यांनी दिला. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी धरणावर सोमवारी (ता.२९) ठिय्या आंदोलन केले.

शेतकऱ्यांनी धरणाच्या गेटजवळ जाऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘‘दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण समूहातून ऐन दुष्काळी परिस्थितीत तब्बल ६०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी प्रकल्पांत सोडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. भाजप-शिवसेना सरकारकडे पाण्याबाबत कोणतेही नियोजन नाही. शेतीबाबत सरकारमधील कुणाला काहीही कळत नाही. जायकवाडी धरणात पिण्यासाठी पाणी उपलब्ध असतानाही नाशिकचे पाणी त्यासाठी सोडण्याचा घाट घातला जात आहे. दिंडोरी तालुक्यातील शेतकरी पालखेड कालव्यातच साखळी उपोषणाला बसतील``, असा इशारा या वेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी दिला.माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले, ‘‘नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा प्रकार हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.``

गोदावरी तापी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी घाटमाथ्यावरील समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवावे, अशी मागणी श्रीराम शेटे यांनी केली.यानंतर सोमनाथ मोरे, विठ्ठलराव संधान, भारती पवार, तानाजी पगार, नंदकुमार सोमवंशी आदींनी मनोगत व्यक्‍त केले.

भास्कर भगरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रताप मोरे, सुरेश खोडे, राजेंद्र उफाडे, विलास कड, रघुनाथ पाटील, जनार्दन उगले, रामभाऊ माळोदे, भीमराव मोरे, राजेंद्र निरगुडे, बापूसाहेब वाढवणे, बाळासाहेब बनकर, संजय मोरे, गणेश बनकर, रामकृष्ण खोडे, बापूसाहेब कडाळे, अल्पेश पारख, बाळा बनकर, सुहास मोरे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड...
कृषी क्षेत्रातील उत्पन्नाची तफावत दूर...औरंगाबाद : गेल्या कित्येक वर्षांतील परिवर्तनात...
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पालखेडमधून आज आवर्तन सोडण्याची तयारीनाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...