माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन

माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन
माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन

आपटाळे, जि. पुणे ः माणिकडोह धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भविष्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण होईल या भीतीने माणिकडोह धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांमधील शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कबाडवाडी माणिकडोह चौकात आंदोलन केले. आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी कमी पडणार नसल्याची खात्री दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. 

याबाबत शेतकरी सारंग घोलप यांनी सांगितले की, कुकडी प्रकल्प साखळीतील माणिकडोह धरणातून जवळपास दोन महिने आवर्तन सुरू होते. आवर्तन बंद झाल्याचे घोषित करण्यात आले. तरी देखील पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला. धरणातील पाण्याची सद्यस्थिती पाहता पुढील सहा महिने पाणी टिकण्याची शक्यता कमी झाल्याने या धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाला व शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. 

प्रशासनाने याची दखल घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आमदार शरद सोनवणे यांनी आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन माघे घेतले. 

याप्रसंगी पाडळीचे सरपंच संतोष केदारी, सारंग घोलप, संतोष खंडागळे, अरुण पापडे, मच्छीन्द्र पानसरे, अंकुश खंडागळे, राजू नायकोडी, संदेश खंडागळे यांसह परिसरातील पाडळी, खामगाव, माणिकडोह, पिंपळगाव सिद्धनाथ, अलदरे, गोळेगाव या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com