agriculture news in marathi, movement to wake up the government says Kunjir | Agrowon

सरकारला जागे करण्यासाठी 'आक्रोश आंदोलन' : कुंजीर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नगर :  मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी संप आदी आंदोलनांमधून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीने पुणे जिल्ह्यातील कानगावमध्ये शेतकरी आक्रोश राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या संपाच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे सुरू केल्याची माहिती, शेतकरी आक्रोश कृती समितीचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली.

नगर :  मराठा क्रांती मोर्चा, शेतकरी संप आदी आंदोलनांमधून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडल्या. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी आक्रोश कृती समितीने पुणे जिल्ह्यातील कानगावमध्ये शेतकरी आक्रोश राज्यव्यापी संप सुरू केला आहे. या संपाच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे सुरू केल्याची माहिती, शेतकरी आक्रोश कृती समितीचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिली.

या वेळी संभाजी दहातोंडे, विजय काकडे, संतोष नानवटे, मकरंद जुनावणे आदी उपस्थित होते. श्री. कुंजीर म्हणाले, १९८२ पासून शेती मालाला हमीभाव मिळावा ही मागणी केली जात आहे. पुणतांबे (ता. कोपरगाव) येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला.

त्यावेळी या संपातील सदस्यांना कोणतीही निकष न लावता कर्जमाफी देणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र शासन आदेशातून कर्जमाफीचे निकष लागू करण्यात आले. हे निकष अधिकाऱ्यांना कळेनात. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होताना दिसत नाही. म्हणून कानगावच्या शेतकऱ्यांनी शेतकरी आक्रोश कृती समिती स्थापन करून गुरुवारपासून (ता.२) शेतकरी आक्रोश आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नाही. कृती समितीच्या शिष्टमंडळात गावातील पाच ग्रामस्थांसह सहा ते आठ जणांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ राज्य सरकारशी बोलणी करण्यासाठी जाणार नसून राज्य सरकारच्या प्रतिनिधींनीच गावासमोर येऊन मागणीसंदर्भात ग्रामसभेत शिष्टमंडळाशी बोलावे, असे श्री. कुंजीर यांनी सांगितले.

सध्या शेतकरी आक्रोश कृती समिती राज्यभर दौरे करत आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसंदर्भात १९ नोव्हेंबरला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुंजीर यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...