agriculture news in marathi, mp, mla absence for kharip planning meeting, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरातील खरीप हंगाम बैठकीला खासदार, आमदारांची पाठ
राजकुमार चौगुले
बुधवार, 11 एप्रिल 2018
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खरीप हंगामाच्या बैठकीत दोन खासदारांसह एकाही आमदाराने उपस्थिती दाखविण्याचे स्वारस्य न दाखवून शेतीप्रश्‍नांबाबत आपली अनास्था स्पष्ट केली.
 
खरीप हंगामाबाबतची जिल्हास्तरीय बैठक रविवारी (ता.८) झाली, पण बैठकीला जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित राहिला नाही. दोन खासदारांसह जिल्ह्यात जनतेतून निवडून आलेले दहा, तर विधान परिषदेचा एक आमदार आहे. खरं तर या बैठकीत योजनांचा ऊहापोह झाला. अनेक गंभीर प्रश्‍नांवर चर्चा झाली. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे अपूर्ण आहेत.
 
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या खरीप हंगामाच्या बैठकीत दोन खासदारांसह एकाही आमदाराने उपस्थिती दाखविण्याचे स्वारस्य न दाखवून शेतीप्रश्‍नांबाबत आपली अनास्था स्पष्ट केली.
 
खरीप हंगामाबाबतची जिल्हास्तरीय बैठक रविवारी (ता.८) झाली, पण बैठकीला जिल्ह्यातील एकही आमदार उपस्थित राहिला नाही. दोन खासदारांसह जिल्ह्यात जनतेतून निवडून आलेले दहा, तर विधान परिषदेचा एक आमदार आहे. खरं तर या बैठकीत योजनांचा ऊहापोह झाला. अनेक गंभीर प्रश्‍नांवर चर्चा झाली. अनेक गावांमध्ये जलसंधारणाची कामे अपूर्ण आहेत.
 
समन्वयाचा अभाव व कागदोपत्री पूर्तता न झाल्याने मार्चच्या शेवटच्या दिवशी साडेतीन कोटींचा निधी परत गेला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक गावांची कामे प्रलंबित राहिली. याचबरोबर प्रत्येक गावातील विविध योजनांच्या त्रुटींवर मर्यादेवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली.
 
पालकमंत्री पाटील यांनी स्वत:ला माहिती नसलेले अनेक प्रश्‍न अधिकाऱ्यांकडून समजावून घेतले, परंतु अधिकारी व शेतकरी यांच्यातील दुरावा मांडण्यास जिल्ह्यातील एकही खासदार आमदार या बैठकीस उपस्थित राहिला नाही किंवा त्यांच्या वतीने व्यवस्थेतील त्रुटी मांडणारा प्रतिनिधीही उपस्थित राहिला नाही. कोट्यावधी रुपयांची कामे बाकी असूनसुद्धा विविध भागातील प्रश्‍न मांडले न गेल्याने या बैठकीत फारशी वादळी चर्चा झाली नाही.
 
खरं तर निधी परत गेल्याच्या कारणावरून लोकप्रतिनिधींनी कृषी विभागाला धोरवर धरणे अपेक्षीत होते, पण कृषी विभागाकडे खासदार, आमदारांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या बैठकीची हवा निघून गेल्याचे चित्र होते. फक्त शासकीय पातळीवरून हो ला हो करीत बैठक पार पडल्याचे चित्र आहे.  पालकमंत्री पाटील यांनी झालेल्या काही कामांच्या पाहणीचे स्पॉट निश्‍चित करून या कामांना भेट देण्याचे ठरविले.
 
मात्र इतर लोकप्रतिनिधींनीही  बैठकीत समस्या मांडण्याची तसदी न घेतल्याने कृषी विभाग म्हणेल ते सगळे लोकप्रतिधींना मान्यच आहे का किंवा त्यांच्या कारभारावर सगळेच लोकप्रतिनिधी खूष आहेत, असेच चित्र दिसले. अहवाल वाचन व त्यावरील मुळमुळीत चर्चा यावरच बैठक झाल्याने यातून काय निष्पन्न झाले, याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...