Agriculture News in Marathi, MP Raju Shetti criticise on govt, maharashtra | Agrowon

शेतकरी चळवळ मोडण्याचा प्रयत्न : राजू शेट्टी
सूर्यकांत नेटके
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017
नगर ः उसाच्या दराबाबत आजीबात अवास्तव मागणी केली जात नाही. सरकार आणि कारखानदार मात्र ऊसदराचा प्रश्‍न जाणीवपूर्वक ताणून धरत आहेत.  सहकारी साखर कारखाने खासगी मालमत्ता समजूनच काही नेते वागत आहेत. गोळीबार, गुंडागर्दी करूनच शेतकरी चळवळ मोडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.
 
नगर ः उसाच्या दराबाबत आजीबात अवास्तव मागणी केली जात नाही. सरकार आणि कारखानदार मात्र ऊसदराचा प्रश्‍न जाणीवपूर्वक ताणून धरत आहेत.  सहकारी साखर कारखाने खासगी मालमत्ता समजूनच काही नेते वागत आहेत. गोळीबार, गुंडागर्दी करूनच शेतकरी चळवळ मोडण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केला.
 
शेवगाव तालुक्‍यातील घोटण येथे मेळाव्यासाठी जाताना खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता. २६) सकाळी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की कोल्हापूर, सांगली भागांत साडेतेराच्या जवळपास साखर उतारा मिळतो आणि नगरसह अन्य भागात साडेनऊच्या पुढे उतारा का जात नाही याचा विचार केला पाहिजे. संपूर्ण राज्यात उसाला एकच दर मागण्यापेक्षा उताऱ्याची चोरी कशी थांबता येईल हे शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजे.
 
कारखानदार नियोजन करून उताऱ्याची चोरी करत आहेत. नगर जिल्ह्यामधील शेतकरी आमच्यासमोर उभा राहत नाही, आम्ही किंमत देत नाही असे कारखानदार म्हणतात. कारखानदार नेते शेतकऱ्यांच्या विरोधातच आहेत हे पुन्हा स्पष्ट झाले आहे, असा अारोप त्यांनी केला.
 
साखर कारखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ, वजन काट्यावर आणि साखरेची साठवण केली जाणाऱ्या गोडाऊनमध्ये ‘सीसीटीव्ही'' कॅमेरे बसवले पाहिजेत. उत्पादकांनी फुटेजची मागणी केली तर उपलब्ध झाले पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे.
 
शेवगाव तालुक्‍यातील अांदोलनात गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले काम केले, त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करत आहोत, असे श्री. शेट्टी म्हणाले.
 
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘शेतकरी सूकाणू समितीशी स्वाभिमानीचा फक्त कर्जमाफी एवढ्यापुरताच सबंध होता. त्यानंतर जर कोणी अन्य अांदोलनातबाबत बोलत असेल तर आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. राज्यात ऊसदराबाबत फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच काम करत आहे, असे स्पष्ट करत सूकाणू समितीत ‘मोठे’ नेते असल्याचा टोला त्यांनी मारला. 
 
‘मुलांचे एसटी पास रोखू नका’
श्री. शेट्टी म्हणाले, की अांदोलनातून एसटीचे नुकसान झाले म्हणून घोटण, खानापूर भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना एसटी पास द्यायचे नाही अशी एसटी आगार प्रमुखांनी भूमिका घेतली ती योग्य नाही. एसटीवाल्यांनी वाकड्यात शिरू नये. पास तर रोखून बघा, बघू काय करायचे ते, असा इशारा त्यांनी दिला अाहे.

इतर ताज्या घडामोडी
कळमणा बाजार समितीत गव्हाची आवक वाढलीनागपूर ः बाजारात गव्हाची आवक वाढली असून सरासरी...
जळगाव बाजार समितीत हिरव्या मिरचीचे दर...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या...
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५००...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
नगर : अकोल्यात कांदा प्रतिक्विंटल ११००...नगर ः जिल्ह्यातील राहुरी, राहाता, अकोले पारनेर...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
कानिफनाथ महाराज समाधी दर्शनासाठी...मढी, जि. नगर  : भटक्यांची पंढरी अशी ओळख...
सोशल मीडियावर चढला निवडणुकांचा ज्वरनागपूर ः सोशल मीडियावरच पक्ष पदाधिकारी,...
हवाई दलात चार ‘चिनुक' हेलिकॉप्टर सामीलचंडीगड ः ‘चिनुक' हेलिकॉप्टरमुळे परिस्थितीत...
नाट्यमय घडामोडीत काॅँग्रेसने चंद्रपूरचा...चंद्रपूर  ः विनायक बांगडे यांच्या उमेदवारीला...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सातारा ः जिल्ह्यातील साखर गाळप हंगाम अंतिम...
पाणी अमूल्य असल्याने जनजागृतेची गरज ः...कोल्हापूर : ‘‘पाण्यासाठी व्यापक जनजागृती होणे...