agriculture news in marathi, MPKV to host Avishkar 2017 competition | Agrowon

राज्यस्तरीय आविष्कार-२०१७ स्पर्धा १५ ते १७ जानेवारी दरम्यान
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

राहुरी, जि. नगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा आविष्कार-२०१७ चे आयोजन १५ ते १७  जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भाटकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा अध्यक्षस्थानी आहेत. 

राहुरी, जि. नगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा आविष्कार-२०१७ चे आयोजन १५ ते १७  जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन बिहार येथील नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भाटकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा अध्यक्षस्थानी आहेत. 

अाविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये राज्यातील कृषी व अकृषी असे एकूण २० विद्यापीठांचे ९६० विद्यार्थी विविध संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांबरोबर ४० संघनायक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी परराज्यांतून ३६ तज्ज्ञ परीवेक्षक बोलविण्यात आलेले आहेत. या संशोधन स्पर्धेमध्ये विविध विभागांत विद्यार्थी त्यांचे संधोधन प्रकल्प सादर करणार आहेत. यामध्ये पहिला विभाग मानवता, भाषा आणि कला, दुसरा विभाग वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसरा विभाग विज्ञान, चौथा विभाग कृषी व पशुसंवर्धन, पाचवा विभाग अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, सहावा विभाग औषधे आणि फार्मसी या सहा विभागांतून पदवी, पदवीव्युत्तर, पीएचडी आणि शिक्षक आपले संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. 

या तीन दिवस चालणाऱ्या आविष्कार स्पर्धेचा समारोप १७ जानेवारीस होणार आहे. या प्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या आणि पीकशास्त्र) डॉ. ए.के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहे. कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथ अध्यक्षस्थानी आहेत. या वेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आणि मान्यवर उपस्थित असणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...