agriculture news in Marathi, Msc agri admissions will start by Monday, Maharashtra | Agrowon

पदव्युत्तर कृषी शाखेचे प्रवेश सोमवारपासून
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

कृषी पदव्युत्तर पदवीसाठी अजिबात उशीर झालेला नाही. सर्व्हरच्या अडचणींमुळे आम्ही पहिल्या टप्प्यात पदवीची प्रवेश प्रक्रिया संपविली असून ३० ऑगस्टपर्यंत पदव्युत्तरची प्रक्रियादेखील समाप्त केली जाईल. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.  
- डॉ. हरिहर कौसडीकर, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद.

पुणे: राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून (ता. ३०) सुरू करण्यात येणार आहे. पदव्युत्तरसाठी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश (सीईटी) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आले होते. मात्र, यंदा कोणतेही कारण जाहीर न करता प्रवेश प्रक्रिया लांबल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, असे विद्यार्थी प्रतिनिधींचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळामार्फत २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी सीईटी घेण्यात आली होती. त्यासाठी १६ हजार ८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर लगेच पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आता परिषदेने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. 

खासगी महाविद्यालयांमध्ये पदवीप्रमाणे पदव्युत्तर शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे विद्यार्थी पूर्णतः सरकारी महाविद्यालयांवर अवलंबून असतात. सध्या डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ, दापोली, डॉ.  पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित ११ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा आहे.

एमएस्सीमध्ये कृषीसाठी ८८५ जागा असून उद्यानविद्या १३४, वनशास्त्र २१, मत्सशास्त्र २८, अन्नतंत्रज्ञान १५, जैवतंत्रज्ञान ३२, एमबीए ९५, अभियांत्रिकी ७०, गृहविज्ञान १२ तर काढणीपश्चात व्यवस्थापनासाठी ३० जागा असून एकूण १३२२ जागांसाठी प्रवेश दिला जाईल. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी पदवीची तात्पुरती गुणपत्रकेदेखील विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना दिलेली आहेत. गेल्या शैक्षणिक वर्षात १० जुलैला पदव्युत्तरचे प्रवेश सुरू होऊन २१ जुलैपर्यंत प्रक्रिया संपविण्यात आली होती.

त्यामुळे १२ ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये अध्यपनाचे काम सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज, वेळापत्रक व नियमावली www.mcaer.org व maha-agriadmission.in या संकेतस्थळांवर मिळू शकते, असे परिषदेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. 
 

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...