वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणची कारवाई सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने धडक कारवाई सुरू केली आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी ''शून्य थकबाकी'' मोहीम नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. ही मोहीम या महिन्यात आणखी तीव्र करण्याची सूचना प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिली आहे.

थकीत वीजबिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित होणारच हा संदेश वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईतून देण्याचे निर्देश त्यांनी पाचही जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांची वसुली आणखी वेगाने होण्यासाठी ''शून्य थकबाकी'' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक संचालक ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे, हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com