agriculture news in Marathi, Msp for roe jute 3700 rupees per quintal, Maharashtra | Agrowon

कच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नवी दिल्ली ः कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल.

जूटचा हमीभाव जाहीर करताना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य व रास्त दर मिळावा, याचा विचार करण्यात आला आहे; तसेच हमीभाव वाढविल्याने शेतकरी जूटच्या शेतीत गुंतवणूक वाढवतील. त्यातून जूटची उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही; तसेच देशात जूटचे उत्पादन वाढून मागणी भागविता येईल.

कच्च्या जूटच्या हमीभावात कृषीमूल्य आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशीनंतर वाढ करण्यात आली आहे. सीएसीपी कोणत्याही उत्पादनाचा हमीभाव ठरविताना अनेक घटक लक्षात घेते. शेतमालाचा उत्पादन खर्च, एकूण मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय किमती, पर्यायी पिकाच्या किमतीचे गुणोत्तर, कृषी आणि अकृषीक क्षेत्रातील व्यापाराच्या अटी आणि त्या पिकाच्या हमीभावाच्या एकूण अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आदी घटक विचारात घेतले जातात. 

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...