agriculture news in marathi, Mug, Udid Soybean registration again increased | Agrowon

मूग, उडिद सोयाबीन नोंदणीची मुदत पुन्हा वाढवली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडिद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मुदत वाढवूनही नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आता पुन्हा एकवीस दिवसांसाठी नोंदणीची मुदत वाढवली असून, आता तीनही पिकांची १५ नोव्हेंबरपर्यत नोंदणी सुरू राहणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत मूग, सोयाबीन, उडदाची मिळून ७ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडिद, सोयाबीनची खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. मुदत वाढवूनही नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. आता पुन्हा एकवीस दिवसांसाठी नोंदणीची मुदत वाढवली असून, आता तीनही पिकांची १५ नोव्हेंबरपर्यत नोंदणी सुरू राहणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत मूग, सोयाबीन, उडदाची मिळून ७ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या मालाची हमीदरानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी मात्र मालाचा दर्जा चांगला नसल्याचे कारण पुढे करत (आधारभूत) हमीदराने खरेदी केली जात नाही. त्यामुळे शासनाने खरेदी मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतमालाची हमीदराने खरेदी करता यावी यासाठी शासनीने हमी केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात होती. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कृषी विभागाकडून उत्पादनाच्या शक्‍यतेची माहिती घेऊन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे वरिष्ठांना कळवले होते. २५ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली.

९ आक्‍टोबरपर्यंतचा कालावधी दिला होता. पंधरा दिवसांचा अवधी असला तरी प्रत्यक्षात केवळ सहा ते सात दिवसच नोंदणी करता आल्याने पुन्हा पंधरा दिवसांची मुदत वाढवून २४ आक्‍टोबरपर्यंत करण्यात आली होती. मात्र, मुदतवाढीतही फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने आता पुन्हा एकवीस दिवस म्हणजे १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन, मूग, उडदाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची नामुष्की आली. दरम्यान दोन वेळा मुदतवाढ देऊनही आतापर्यंत सात हजार ८५७ शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर सोयाबीन, मूग, उडीद विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी खरेदी केंद्रे चालकांकडून झालेला त्रास, पैसे मिळण्यास लागणारा उशीर अशा अनेक कारणाने ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.

खरेदी केंद्रे सुरू तरी कधी होणार?
शेतकऱ्यांच्या मालाची बाजारात हमीदरानुसार खरेदी होत नसल्याने शासनाने हमी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. केंद्रे सुरू करणार असल्याचे सांगून आता दोन महिन्यांचा कालावधी झाला. ऑनलाइन नोंदणीही करुन घेतली जात आहे. मात्र, अजून जिल्ह्यामध्ये कुठेही खरेदी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली दिसत नाहीत. खरेदी केंद्रे सुरू कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये मूग, उडदाची बाजारपेठेत हमीदराने खरेदी होताना दिसत नाहीत. एकतर हमी केंद्रे आत्तापर्यंत सुरू व्हायला पाहिजे होती. मात्र ती सुरू झाली नाही. आता ऑनलाइन नोंदणीची मुदत वाढवली, पण खरेदी केंद्रे नेमके कधी सुरू करणार आहेत.
-शरद मरकड, पाथर्डी, जि. नगर

आतापर्यंत झालेली नोंदणी
 मूग        ः १३९७
 सोयाबीन ः १२८
 उडीद        ः ६३१२

इतर बातम्या
पुण्यात कांदा, लसूण, फ्लॉवरच्या दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
'आणखी साखर तयार कराल, तर खड्ड्यात जाल'विटा, जि सांगली : पाणी आले म्हणून साखरेचे...
शिपायाने घातला शेतकऱ्यांना २२ लाखांला...वर्धा : पशुसंवर्धन विभागाच्या अनुदानावरील...
धान्य पट्ट्यात २०१८मध्ये ४३ शेतकरी...भंडारा : सिंचन, पर्यायी आणि व्यवसायिक पद्धतीविषयी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीरपुणे  : जिल्ह्यात पाणीटंचाईबरोबरच...
नांदेड जिल्ह्याला एक लाख क्विंटल...नांदेड : नांदेड जिल्ह्यात २०१९-२० मधील खरीप...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने ३८५७ क्विंटल...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य...
खानदेशात मे महिनाअखेरीस कापूस बियाणे...जळगाव  ः खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड...
नांदेड विभागात ७८ लाख टन ऊस गाळपनांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड...
गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि...
अनुकूल हवामानामुळे यंदा दर्जेदार...सांगली : यंदा बेदाणा निर्मितीसाठी अनुकूल हवामान...
एकतीस वर्षांतही संपले नाही गोसेखुर्द...भंडारा : राज्यकर्त्यांच्या निष्क्रीयतेमुळे...
शेती, शेतकऱ्यांचे हित जपणारे सरकार...फलटण, सातारा : ‘‘लोकसभा निवडणुकीकडे जगाचे...
बागायती कोल्हापूरचा दुष्काळग्रस्तांना...कोल्हापूर : पाणीटंचाईमुळे दूरवरून पाणी आणण्यासाठी...
नागपूर विभागातील प्रकल्पात  उरला १० टक्...नागपूर  : विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये...
यवतमाळ जिल्ह्यात नाफेडची तूर खरेदी बंदयवतमाळ  : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात...
माझे लक्ष्य विधानसभा निवडणूक : राज ठाकरेमुंबई : लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, हे मी...
शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर...नाशिक : शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू राहिलेल्या...
जळगाव जिल्ह्यातील ६७ शाळांना सौर प्रकल्पजळगाव  ः  जिल्हा परिषद शाळांमधील...
नगर मतदारसंघात अठरा लाख मतदार बजावणार...नगर  : नगर मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८...