agriculture news in marathi, Mukesh Ambani becomes Richest Indians, Forbes list released | Agrowon

श्रीमंत भारतीयाचा मान पुन्हा अंबानींना ; फोर्ब्सची यादी जाहीर
वृत्तसेवा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नवी दिल्ली : फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 43.5 अब्ज डॉलर असून, चालू वर्षात त्यामध्ये 9.3 अब्ज डॉलरची भर पडली आहे. अंबानी यांच्यापाठोपाठ "विप्रो'चे चेअरमन अझिम प्रेमजी यांनीही आपले दुसरे स्थान कायम राखले असून, त्यांची एकूण संपत्ती 21 अब्ज डॉलर इतकी आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 2 अब्ज डॉलरने वाढ झाली. 

"अर्सेलर मित्तल'चे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत तिसऱ्या स्थानी असून, त्यांची एकूण संपत्ती 18.3 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यात चालू वर्षात 1.8 अब्ज डॉलरने वाढ झाली. मित्तल यांच्यापाठोपाठ हिंदूजा ब्रदर्स आणि पालनजी मिस्त्री हे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती अनुक्रमे 18 व 15.7 अब्ज इतकी असल्याची माहिती फोर्ब्सने दिली. 

'टॉप 10' मध्ये यांचा समावेश 

- शिव नाडर (14.6) 
- गोदरेज कुटुंब (14) 
- दिलीप संघवी (12.6) 
- कुमार बिर्ला (12.5) 
- गौतम अदाणी (11.9) 
(एकूण मालमत्ता अब्ज डॉलरमध्ये) 

मजुमदार यांची मोठी झेप 

फोर्ब्सच्या यादीत चार महिलांचा समावेश असून, त्यापैकी एक असलेल्या बायोकॉन लिमिटेडच्या चेअरमन किरण मजुमदार यांच्या संपत्तीत (66.5 टक्के) सर्वाधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले. 3.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह त्या 39 व्या स्थानावर असून, गेल्यावर्षी 72 क्रमांकावर होत्या.  

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्हा बॅंक देणार मध्यम मुदत...सातारा :  स्थापनेपासून गेल्या ६८ वर्षांत...
औरंगाबादेत हिरवी मिरची ४००० ते ५०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव : खरिपाचा रासायनिक खतपुरवठा रखडलाजळगाव : रासायनिक खतांचा खरिपासंबंधीचा पुरवठा...
दुष्काळी मदतीची गावनिहाय माहिती जाहीर...मुंबई  : राज्यातील बहुतांश...
पाण्यासाठी भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन मांडवगण फराटा, जि. पुणे  : घोड आणि...
निम्‍न दुधना धरणाच्या पाण्यासाठी...परभणी : दुष्काळामुळे मानवत तालुक्यातील दुधना...
‘उजनी’काठच्या शेतकऱ्यांची पिके...भिगवण, जि. पुणे   ः प्रशासनाच्या...
पुणे जिल्ह्यातील धरणे तळाशीपुणे  : जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा...
अकोल्यातील खरीप आढावा बैठक...अकोला  ः शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या...
दुष्काळ निवारणासाठी सातारा जिल्हा...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍...
फळबागेत पाणी साठवण कुंड कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याचे...
फणस लागवड  उष्ण व दमट हवामान फणस पिकाला मानवते....
ऊसवाढीच्या टप्‍प्यानुसार द्या पुरेसे...जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची...
पोटदुखीवर पेटाराच्या सालीचा काढा उपयुक्तस्थानिक नाव    : पेटार, पेटारी,...
उष्ण, कोरडे हवामान मॉन्सून वाटचालीस...महाराष्ट्राच्या पश्‍चिम भागावर १००८ हेप्टापास्कल...
भंगाराम तळोधी येथे राइसमिलवर कारवाईचंद्रपूर ः कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय...
परभणीत कोबीला प्रतिक्विंटल १२०० ते २०००...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिक जिल्ह्यातील ५४३ गावांची...नाशिक ः गावठाण निश्‍चितीसाठी गावांमध्ये ग्रामसभा...
नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस...नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू...
अनुदानाअभावी चारा छावण्या संकटातबिजवडी, जि. सातारा : माण तालुक्‍यामध्ये १९७२...