agriculture news in marathi, Mumbai APMC SES scam culprit will be punished | Agrowon

मुंबई बाजार समिती घोटाळ्यातील दोषींवर कारवाई
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

नागपूर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुमारे दोनशे कोटींच्या सेवाकर घोटाळ्याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत बुधवारी (ता. १३) केली.

नागपूर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सुमारे दोनशे कोटींच्या सेवाकर घोटाळ्याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत बुधवारी (ता. १३) केली.

बाजार समिती प्रशासनाने सेवाकर वसुलीत केलेल्या गैरव्यवहारावर भाजप आमदार आशिष शेलार, संजय केळकर आदींनी तारांकित प्रश्न मांडला होता. त्याला उत्तर देताना सुभाष देशमुख बोलत होते. दैनिक अॅग्रोवनने या प्रकरणाचा पाठपुरावा करीत हा घोटाळा उघडकीस आणला होता. अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत आशिष शेलार, संजय केळकर आदी सदस्यांनी विधानसभेत हा प्रश्न लावून धरला. समितीतील हा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन सदस्यीय समिती नेमल्याचे मंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. तर या समितीचा अहवाल कधी येणार आहे. तसेच सेवाकर वसुलीची जबाबदारी पणन अधिकाऱ्यांची होती. त्यामुळे त्यांनी ही वसुली केली नसेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. संजय केळकर म्हणाले, की समिती नेमून तीन महिने झाले आहेत. हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा आहे. बाजार समितीतील सदस्यांऐवजी शासन उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून याची चौकशी करणार आहे का. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी सेवाकर बुडवला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहात का, अशी विचारणा केली. 

त्याला उत्तर देताना मंत्री देशमुख म्हणाले, पणन संचालकांनी सेवाकर वसुलीचा अध्यादेश काढला होता. मात्र, समितीतील व्यापाऱ्यांचा सेवाकर वसुलीला विरोध होता. याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे. या अहवालावर अभ्यास सुरू आहे, असे थातूरमातूर उत्तर देत त्यांनी ठोस कारवाईसंदर्भात बोलण्याचे टाळले. त्यामुळे शेलार यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करीत संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करणार आहात का, अशी आग्रही विचारणा केली. त्यावर मंत्री देशमुख यांनी चौकशी करून सेवाकर घोटाळ्यात दोषी आढळल्यास संबंधित बाजार समितीच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली. 

सेवाकर घोटाळ्याचे प्रकरण काय आहे?
पणन संचालक कार्यालयाने डिसेंबर २०१३ मध्ये व्यापाऱ्यांकडून शेकडा एक रुपया प्रमाणे सेवा शुल्क आकारणीस मुंबई बाजार समितीस परवानगी दिली. त्यानुसार समितीच्या तत्कालीन सचिवांनी समितीमधील पाचही मार्केटना मार्च २०१४ मध्ये सेवा शुल्क आकारण्याचे आदेश बजावले. मात्र, प्रशासनाकडून गेल्या तीन वर्षांत एकाही व्यापाऱ्याकडून सेवा शुल्कची वसुली झालेली नाही. सेवा शुल्क वसुलीबाबत समिती प्रशासनाची भूमिका कमालीची संशयास्पद असून, अर्थपूर्ण वाटाघाटीतूनच या वसुलीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे. यामुळे समितीला गेल्या तीन वर्षांत किमान दोनशे कोटी रुपयांचा आर्थिक तोटा सहन करावा लागला असल्याचा आरोप होत आहे.

समितीची घोटाळ्यांची पार्श्वभूमी 
शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक आणि गैरव्यवहारांच्या बाबतीत मुंबई बाजार समिती कुप्रसिद्ध आहे. वाशीमध्ये सुमारे दोनशे एकरांवर बाजार समितीचा विस्तार आहे. समितीमध्ये भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाले अशी पाच मार्केट आहेत. समितीची २०१२-१३ ची वार्षिक उलाढाल सुमारे १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. या उलाढालीतून वर्षाला सुमारे ११४ कोटींचे उत्पन्न समितीला मिळत होते. २०१४ पासून समितीवर प्रशासक आहे. समिती संचालक मंडळाच्या ताब्यात असताना बाजार समितीमधील एफएसआय गैरव्यवहाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. हे १२६ कोटींच्या गैरव्यवहाराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर समितीच्या ६४ कोटींच्या ठेवींवर ६० कोटींचे बोगस कर्ज दिल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशी सुरू आहे. एकामागोमाग घोटाळ्याची मालिका उघडकीस आल्यानंतर सध्या सेवाकर घोटाळ्यामुळे बाजार समिती चर्चेत आहे. 

 

 

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...