आंतरविद्यापीठ युवक महोत्सवात मुंबई विद्यापीठाला विजेतेपद

परभणी ः १५ व्या आंतर विद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. (छायाचित्र ःयोगेश गौतम)
परभणी ः १५ व्या आंतर विद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ मध्ये मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. (छायाचित्र ःयोगेश गौतम)

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये आयोजित १५व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ चा समारोप गुरुवारी (ता. ९) झाला.

या महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला उपविजेतपद मिळाले. पुढील वर्षीच्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे आयोजन नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये केले जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये रविवार (ता. ५) ते गुरुवार (ता. ९) या कालावधीत युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०१७ चे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. ९) या महोत्सवाचा समारोप तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला.

या वेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू होते. खासदार संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण संचालक डाॅ. व्ही. डी. पाटील, संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डाॅ. गजेंद्र लोंढे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डाॅ. महेश देशमुख, डाॅ. अशोक कडाळे, डाॅ. अनिल पाटील, डाॅ. अजय देशमुख, डाॅ. दिनेश भोंडे, डाॅ. एस. ए. चव्हाण आदी उपस्थित होते.

या महोत्सवामध्ये राज्यातील कृषी आणि अकृषी मिळून एकूण १९ विद्यापीठांच्या ७१४ विद्यार्थ्यांनी २४ कला प्रकारांमध्ये सादरीकरण केले. मुंबई विद्यापीठास सर्वसाधारण विजेतेपद मिळाले, तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठास उपविजेतेपद मिळाले. गोल्डन गर्ल पारितोषिक मुंबई विद्यापीठाच्या हिमानी चौधरी हिला, तर गोल्डन बाॅय

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com