agriculture news in marathi, Mumbai will not let a drops of milk go | Agrowon

मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाही
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 जुलै 2018

नाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला नाशिकमधील शेतकरी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला असून, १६ जुलैपासून या संघटना आंदोलनात उतरणार आहेत. मुंबई आणि गुजरातला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून एक थेंबही दूध जाऊ देणार नाही, असा इशारा या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेद्वारे दिला.

नाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने सरकारने लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला नाशिकमधील शेतकरी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दर्शविला असून, १६ जुलैपासून या संघटना आंदोलनात उतरणार आहेत. मुंबई आणि गुजरातला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून एक थेंबही दूध जाऊ देणार नाही, असा इशारा या शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेद्वारे दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलैपासून पुकारण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, किसान सभेचे राजू देसले, जिल्हा समन्वय समितीचे चंद्रकांत बनकर, हिरामण वाघ, सोमनाथ बोराडे, भास्कर शिंदे, नाना बच्छाव, नितीन रोटे, आदी उपस्थित होते.

वडघुले म्हणाले, ''गायींचे आणि शेतकऱ्यांचे आधार कार्ड एकमेकांना लिंक करून त्याआधारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट जमा करावे, अशी आमची मागणी आहे."

रक्त सांडेल, पण दूध सांडणार नाही...
मुंबईला दूध घेऊन जाण्याचा कुणी प्रयत्न केल्यास रस्त्यावरच ही वाहने रोखण्यात येतील. दुधाचा थेंबही रस्त्यावर सांडू दिला जाणार नाही. बळाचा वापर करून, तसेच आंदोलन दडपून दूध मुंबईकडे पाठविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वत:चे रक्त सांडण्याची देखील तयारी असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दूध संघ आणि दूध संकलन केंद्रांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संघटनांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...
कळमणा बाजारात बटाट्याची वाढली आवकनागपूर ः बटाटा आणि डाळिंब या शेतमालाची सर्वाधिक...
मोसंबी, डाळिंबाच्या दरात चढउतारऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपयेनगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल...
कोल्हापुरात घेवडा प्रतिदहा किलो ३००...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
आता खाण्यातही क्रिकेट !क्रिकेट हा आपला खेळ म्हणून माहित असला तरी त्या...
चीन येथील सफरचंद उत्पादकांचा निर्यातीवर...चीनमधील काही भागांमध्ये सफरचंदांचे उत्पादन होते....
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडलेकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह पूर्व...