नगर जिल्ह्यात यंदा मुगाचे उत्पादन घटले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः जिल्ह्यात पाऊस नसल्याने मूग उत्पादनाला मोठा फटका बसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पीक कापणी प्रयोगातील प्राथमिक माहितीनुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुगाचे उत्पादन ५० टक्के घटले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात मुगाचे प्रतिहेक्‍टरी ४२१ किलो ७३३ ग्रॅम उत्पादन होते. यंदा २२५ किलो ३४३ ग्रॅम उत्पादन मिळाले. कर्जत तालुक्‍यात प्रतिहेक्‍टरी केवळ ४४ किलो ६०० ग्रॅम उत्पादन मिळाले.

जिल्ह्यातील सर्वच भागात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. नगर, पारनेरसह जिल्ह्यांतील काही भागात मुगाची लागवड होते. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला नसला तरी अधूनमधून झालेल्या अल्प पावसावर मुगाची पेरणी झाली. त्यामुळे सरासरीच्या तिप्पट क्षेत्रावर पेरणी झालेली असली, तरी त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे.

यंदा जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत १९८ पीक कापणी प्रयोग केले. त्यानंतर प्राथमिक स्तरावरील तालुकानिहाय उत्पादन निश्‍चित झाले. यंदा सर्वाधिक राहुरी तालुक्‍यात ४२२ किलो ५०० ग्रॅम तर नगर तालुक्‍यात हेक्‍टरी ३२२ किलो ७५९  ग्रॅम उत्पादन मिळाले.    मुगाचे उत्पादन व कंसात गतवर्षीचे उत्पादन (प्रति हेक्‍टरी)

  • नगर  - ३२२ किलो ७५९ गॅम (४९४ किलो १०० ग्रॅम)
  • पारनेर - १४९ किलो ६३२ ग्रॅम(४५८ किलो ७३९ ग्रॅम)
  • श्रीगोंदा - २६३ किलो (१७९ किलो ६६७ ग्रॅम)
  • कर्जत - ४१ किलो ६०० ग्रॅम(४९८ किलो ३३३ ग्रॅम)
  • जामखेड - ३२० किलो ६६७ ग्रॅम(२२९ किलो १६७ ग्रॅम)
  • शेवगाव - ८४ किलो ८३३ ग्रॅम(२६० किलो ३३३ ग्रॅम)
  • पाथर्डी - ११५ किलो ८३ ग्रॅम, (२७९ किलो ८८३ किलो)
  • नेवासा - ३०० किलो (२३७ किलो ५०० ग्रॅम)
  • राहुरी - ४४२ किलो ५०० ग्रॅम(२८२ किलो ५०० ग्रॅम)
  • संगमनेर - २५१ किलो ७५० ग्रॅम (६२५ किलो ६६७ ग्रॅम)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com