agriculture news in marathi, Mung, Udadachi hectare, proposed productivity | Agrowon

मूग, उडदाची हेक्‍टरी प्रस्तावित उत्पादकता जाहीर
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

लातूर  : लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील खरीप पिकांची प्रस्तावित प्रथम नजरअंदाज उत्पादकता लातूर कृषी विभागाने जाहीर केली आहे. औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन, सल्लागार समितीच्या बैठकीत ही आकडेवारी ठेवण्यात आली. त्यामध्ये मुगाची हेक्‍टरी उत्पादकता ३ क्‍विंटल ६२ किलो तर उडदाची उत्पादकता ३ क्‍विंटल ९५ किलो दाखविली गेली आहे.

लातूर  : लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांतील खरीप पिकांची प्रस्तावित प्रथम नजरअंदाज उत्पादकता लातूर कृषी विभागाने जाहीर केली आहे. औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या विभागीय कृषी संशोधन, सल्लागार समितीच्या बैठकीत ही आकडेवारी ठेवण्यात आली. त्यामध्ये मुगाची हेक्‍टरी उत्पादकता ३ क्‍विंटल ६२ किलो तर उडदाची उत्पादकता ३ क्‍विंटल ९५ किलो दाखविली गेली आहे.

लातूर कृषी विभागाकडून समोर करण्यात आलेल्या प्रथम नजर अंदाज खरीप पिकांच्या उत्पादकतेत भाताची उत्पादकता हेक्‍टरी ४ क्‍विंटल २ किलो हेक्‍टरी दाखविली गेली आहे. २०१७-१८ मध्ये लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत खरीप ज्वारीचे हेक्‍टरी ६ क्‍विंटल ७२ किलो उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा प्रथम नजरअंदाज उत्पादकता ६ क्‍विंटल ८६ किलो दाखविण्यात आली आहे. बाजरीचे गत खरिपात हेक्‍टरी ३ क्‍विंटल २९ किलो उत्पादन झाले होते. यंदा मात्र, त्यामध्ये २ क्‍विंटल ६३ किलोपर्यंत घट दाखविली गेली आहे. मकाचे उत्पादन गतवेळीच्या खरिपात हेक्‍टरी ७ क्‍विंटल २८ किलोपर्यंत झाले होते. यंदा मात्र त्यात थेट ३ क्‍विंटल ८३ किलोपर्यंतच उत्पादन दाखविले गेले आहे. तुरीचे गत खरीप हंगामात हेक्‍टरी १० क्‍विंटल १२ किलो हेक्‍टरी उत्पादन झाले होते. ते हेक्‍टरी दहा क्‍विंटलपर्यंत खाली येण्याचा नजरअंदाज वर्तविली गेला आहे.

उडदाचे गतवर्षी हेक्‍टरी २ क्‍विंटल ६३ किलो उत्पादन झाले होते. ते ३ क्‍विंटल ९५ किलो हेक्‍टरी तर मुगाचे गतवेळी २ क्‍विंटल ६१ किलो आलेले उत्पादन ३ क्‍विंटल ६२ किलो येण्याचा प्रथम नजरअंदाज वर्तविला गेला आहे. सोयाबीनचे गतवर्षीच्या खरिपात हेक्‍टरी ९ क्‍विंटल ४३ किलो उत्पादन आले होते. त्यामध्ये वाढ होऊन हेक्‍टरी १० क्‍विंटल ६४ किलो उत्पादन प्रस्तावित करण्यात आले आहे. तिळाची हेक्‍टरी १ क्‍विंटल ७२ किलो, भुईमुगाचे हेक्‍टरी ३ क्‍विंटल २२ किलो, सुर्यफूल हेक्‍टरी १ क्‍विंटल ४२ किलो, कपाशीचे हेक्‍टरी ३ क्‍विंटल ३६ किलो यंदाच्या खरिपाची प्रथम नजरअंदाज उत्पादकता स्पष्ट केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...