agriculture news in Marathi, mutter at 500 to 600 rupees in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात ओला वाटाणा ५०० ते ६०० रुपये
राजकुमार चौगुले
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वाटाणा, भेंडीच्या दरात वाढ कायम होती. ओला वाटाण्यास दहा किलोस ५०० ते ६००, तर भेंडीचे दर १०० ते २७० रुपये इतके होते. गवारीची पन्नास ते शंभर पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर होता. कारल्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली. कारल्यास दहा किलोस  ४० ते २५० रुपये दर मिळाला. कारल्याचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वाटाणा, भेंडीच्या दरात वाढ कायम होती. ओला वाटाण्यास दहा किलोस ५०० ते ६००, तर भेंडीचे दर १०० ते २७० रुपये इतके होते. गवारीची पन्नास ते शंभर पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर होता. कारल्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली. कारल्यास दहा किलोस  ४० ते २५० रुपये दर मिळाला. कारल्याचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

दोडक्‍याची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस  ५० ते २२० रुपये दर मिळाला. काकडीच्या आवकेत या सप्ताहातही वाढ होती. काकडीची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. दहा किलोस २० ते २५० रुपये दर मिळाला. गाजराची दीडशे पोत्यांची आवक होती. गाजरास दहा किलोस ५० ते १७० रुपये दर होता. फ्लॉवरची दररोज सहाशे ते सातशे पोती आवक झाली. फ्लॉवरला दहा किलोस  ५० ते २५० रुपये दर होता.

कोथिंबिरीची दररोज शेकडा १९ ते २० हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच ते सहा हजार पेंड्या आवक होती. मेथीस शेकडा ५०० ते १००० रुपये इतका दर मिळाला. 

आंब्याची आवक धीम्या गतीने 
यंदा कोकणातून हापूसची आवक अत्यंत धीम्या प्रमाणात होत आहे. चार डझनाच्या हापूस आंब्याचा दर १००० ते ३००० रुपये इतका आहे. तीनशे ते चारशे पेट्या हापूस बाजार समितीत दररोज दाखल होत आहे, परंतु सध्या कोकणात ढगाळ हवामान असल्याने याची चिंता उत्पादकांना लागली आहे. यामुळे एप्रिलमध्ये नेमकी आंब्याची आवक किती वाढेल, याबाबत सध्या काहीच सांगता येत नसल्याचे फळबाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...
चीनसह बांगलादेशची कापूस आयात वाढणारजळगाव ः देशात आॅगस्टअखेर ११२ लाख हेक्‍टरवर...
भाजीपाला शेतीसह कापूस बीजोत्पादनातील...भाजीपाला पिके तसेच कापूस बीजोत्पादन या पद्धतीतून...
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...