औरंगाबादेत काकडी १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबादेत काकडी १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबादेत काकडी १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) काकडीची ५८ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची १६२ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ३०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

३३ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लावरचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६७ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर २०० ते ३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या गवारीला २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

भेंडीची आवक ३० क्‍विंटल; तर दर १६०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १०८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीचे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. लिंबाची आवक १३ क्‍विंटल झाली. या लिंबाला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३५ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

७ क्‍विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक ६४ क्‍विंटल; तर दर १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४ क्‍विंटल आवक झालेल्या चवळीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वालशेंगांची आवक ६ क्‍विंटल; तर दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ३ क्‍विंटल आवक झालेल्या कारल्याला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

डांगरची आवक ३५ क्‍विंटल; तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिली. ११ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळला. ९ हजार ९०० जुड्यांची आवक झालेल्या पालकला ४५० ते ६०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक २३ हजार जुड्या दर १०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com