agriculture news in marathi, n Parbhani district 57% of the seven-twelve online | Agrowon

परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा आॅनलाइन
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

परभणी : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई-फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोनपेठ तालुक्यातील शंभर टक्के (सर्व ५२ गावांच्या) सात-बारा आॅनलाइन झाला आहे.

परभणी : डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई-फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. सोनपेठ तालुक्यातील शंभर टक्के (सर्व ५२ गावांच्या) सात-बारा आॅनलाइन झाला आहे.

उर्वरित ८ तालुक्यांमध्ये सात-बारा आॅनलाइन करण्याचे काम ३५ ते ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व ८३३ गावांचा सात-बारा आॅनलाइन होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षातील सूत्रांनी दिली.

डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) ई -फेरफार आज्ञावलीद्वारे तलाठी दप्तर संगणकीकरण करून डिजिटल गाव नमुना ७-१२ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८३३ गावांचे सात-बारा आॅनलाइन करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.

महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, नोंदणी विभाग यांनी ई-फेरफार वेब बेस्ड आज्ञावली दुय्यम निबंधक, तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालये एकमेकांशी सुरक्षित कनेक्टिव्हिटीद्वारे जोडली आहेत. नोंदणीकृत दस्तऐवजांच्या बाबतीत दुय्यम निबंधक यांच्याकडून नोंदणी झाल्यानंतर तत्काळ नोंदणीकृत दस्तांची सूचना आज्ञावलीद्वारे तालुका स्तरावरील संबंधित महसूल किंवा भूमी अभिलेख कार्यालयातील म्युटेशन सेलेला दिली जाईल.

त्यासाठीची तलाठ्यांकडून आपोआप फेरफार करण्याची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीने जमीन खरेदीची रजिस्ट्री केल्यानंतर आपोआप त्या जमिनीच्या सर्व्हे नंबरसहित माहिती तहसील कार्यालय तसेच भूमी अभिलेख कार्यालयात संदेशद्वारे जाईल.

या माहितीच्या आधारे संबंधीत शेतजमिनीच्या सात-बारा तर जागेचे पीआर कार्ड यांची फेरफार प्रक्रियादेखील होईल. यामुळे शेतजमीन, जागा खरेदीदारास तलाठी अथवा भूमी अभिलेख कार्यालयात फेरफारसाठी चकरा मारण्याची गरज राहणार नाही. फेरफार प्रक्रिया आपोआप पूर्ण झाल्यानंतर संबंधितास आॅनलाइन डिजिटल स्वाक्षरीची अधिकृत प्रत उपलब्ध होईल. येत्या काळात डिजिटल सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयामध्ये किआॅक्स यंत्र बसविण्यात येणार आहे.

आपले सरकार केंद्र, महा-ई सेवा केंद्र तसेच इंटरनेट कॅफे, महाभूलेख वेबसाईट या ठिकाणी देखील सात-बारा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सोमवार (ता. १३) पर्यंत जिल्ह्यातील ८३३ गावांतील ५७ टक्के सात-बारा नमुने आॅनलाइन करण्यात आले आहेत. सोनपेठ तालुक्यातील सर्व ५२ गावांचा सात-बारा आॅनलाइन झाला आहे.

अन्य तालुक्यांमध्ये परभणी तालुका १३० गावांतील ५१.५४ टक्के सात-बारा आॅनलाइन झाला आहे. जिंतूर तालुक्यातील १६८ गावांतील (३६.९० टक्के), सेलू (८० टक्के), मानवत (६९.८१ टक्के), पाथरी (६९.६४ टक्के), गंगाखेड (३४.२९ टक्के), पालम (६२.५० टक्के), पूर्णा (५६.३८ टक्के) सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...