agriculture news in marathi, nafari migrate in pune market committee, pune,maharahstra | Agrowon

पुणे बाजार समितीत होणार नाफारीचे स्थलांतर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017
पुणे  : पीक उत्पादकतावाढीसाठी आवश्‍यक असलेल्या माती, पाणी परीक्षणाची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबराेबरच प्रक्रिया उद्याेगांसाठी आवश्यक विविध चाचण्यांकरिता प्रसिद्ध असलेली नॅशनल अॅग्रीकल्चर अॅण्ड फूड अॅनॅलिसिस अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (नाफारी) ही प्रयाेगशाळा पुणे बाजार समितीमधील सुसज्ज जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असून, याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
पुणे  : पीक उत्पादकतावाढीसाठी आवश्‍यक असलेल्या माती, पाणी परीक्षणाची मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबराेबरच प्रक्रिया उद्याेगांसाठी आवश्यक विविध चाचण्यांकरिता प्रसिद्ध असलेली नॅशनल अॅग्रीकल्चर अॅण्ड फूड अॅनॅलिसिस अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (नाफारी) ही प्रयाेगशाळा पुणे बाजार समितीमधील सुसज्ज जागेत स्थलांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असून, याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.
 
याबाबतची माहिती प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली. खैरे म्हणाले, की नाफारी ही शेती आणि शेतीपूरक उद्याेगांच्या विविध चाचण्यांसाठीची अत्याधुनिक प्रयाेगशाळा आहे. या प्रयाेगशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी बाजार समितीमध्ये तिचे स्थलांतर करण्याचे आमचे प्रयत्न आहे. या माध्यमातून बाजार समितीला अधिकचे उत्पन्न आणि राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा मिळणार आहे.
 
पीक उत्पादकतावाढी बराेबरच शेतकरी आता प्रक्रिया उद्याेगांमध्ये उतरत आहेत. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या विविध चाचण्यांची सुविधादेखील नाफारीच्या वतीने देण्यात येते. अनेक बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्याेगांसाठी नाफारी सेवा देत आहे. हिच सेवा रास्त दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या प्रयत्नांतून प्रयाेगशाळा बाजार समितीमध्ये आणण्याचे प्रयत्न आहेत. यासाठीच्या प्राथमिक चर्चा, बैठका झाल्या आहेत. 

नाफारीच्या माध्यमातून सरकार आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत बाजार समिती आपल्या दारी ही संकल्पना बाजार समिती राबविणार असून, यासाठी पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांसाठी सुसज्ज माेबाईल व्हॅन प्रयाेगशाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सी.एस.आर. मधून विविध वाहन उद्याेगांशी बाेलून व्हॅन उपलब्ध करून घेणार असल्याचे खैरे यांनी या वेळी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...
शेतकऱ्यांच्या बांधावर तज्ज्ञांकडून...जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत शेतकऱ्यांनी काढला ९० कोटींचा...सांगली ः केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेती विमा...
आरक्षणासाठी आता ‘ठोक मोर्चा’ काढणारनाशिक :  देवेंद्र फडणवीस सरकार मराठा...
धमकीमुळे गंगापूर धरणाचे संरक्षण वाढविलेनाशिक : ‘हम यूपीसे बोल रहें हैं, गंगापूर बांध के...
ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी स्वतंत्र योजना...नागपूर  : वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना...
पीक कर्जवाटपात सातारा जिल्हा अव्वलसातारा  : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरलानगर  ः जिल्ह्यात सध्या फक्त अकोले तालुक्‍...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची साडेसहा...नगर  ः जलयुक्त शिवार योजनेतून २०१७-१८...