agriculture news in Marathi, NAFED have problem in onion procurement, Maharashtra | Agrowon

‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून १२ हजार टन कांदा खरेदी करण्यात आला; परंतु उर्वरित १३ हजार टन कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. कांदा साठवणुकीसाठी चाळीच उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा ठेवायचा कुठे, हा प्रश्न आता नाफेडसमोर निर्माण झाला आहे.

नाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच कांदा उत्पादकांना भाववाढीचा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत किंमत स्थिरीकरण निधीच्या माध्यमातून २५ हजार टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत तब्बल १३ कोटी रुपये खर्च करून १२ हजार टन कांदा खरेदी करण्यात आला; परंतु उर्वरित १३ हजार टन कांदा खरेदीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. कांदा साठवणुकीसाठी चाळीच उपलब्ध नसल्याने खरेदी केलेला कांदा ठेवायचा कुठे, हा प्रश्न आता नाफेडसमोर निर्माण झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात नगदी पीक असलेला उन्हाळ कांदा या सप्ताहात शंभर रुपयाने घसरला आहे. इतर राज्यातून दाखल होत असलेल्या लाल कांद्यामुळे उन्हाळ कांद्याला फटका बसला आहे. ७ व ८ आॅगस्ट रोजी विक्री झालेला ११४५ रुपयांचा कमाल भाव सोमवारी (ता.१३) लिलावात जाहीर झाला आहे. गेल्या काही महिन्यांत लाल कांदा दरात अनपेक्षितपणे तेजी आली; परंतु उन्हाळ कांदा या हंगामात एकदाही तेजीत आला नाही. त्यामुळे मोठे आर्थिक उत्पन्न मिळवण्याची आशा ठेवून जपून साठविलेला कांदा कमी दरात विक्री होत आहे.

कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, केंद्राने केलेल्या उपाययोजनादेखील प्रभावी ठरल्या नाहीत. कांद्यावरील किमान निर्यात मूल्य दर शून्य; तसेच कांदा निर्यात प्रोत्साहन पाच टक्के अनुदान असूनसुद्धा कांदा दर सुधारत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

वाहतूकदारांच्या या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला पाच ते सहा लाख क्विंटल कांदा चाळीत पडून होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या कांद्याची वाहतूक ठप्प असल्याने निर्यातीलासुद्धा या संपाचा फटका बसलेला होता. याशिवाय बदलत्या वातावरणाचा फटका चाळीत साठवलेल्या कांद्याला बसत असून, आज मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरेदी केलेला कांदा बाहेर न गेल्यामुळे निफाड उपआवारावरील लिलाव मागील सप्ताहात चार दिवस बंद राहिले होते.

महिनाभरात २५ टक्के घट
३ जुलैला सरासरी १३०१ रुपये प्रतिक्विंटल विकला जाणारा कांदा एक महिन्यानंतर हजार रुपयांच्या घरात आला आहे. जवळपास एका महिन्यात कांद्याच्या दरामध्ये २५ टक्क्यांची घसरण झाली आहे. कांदा निर्यातीस चालना देण्यासाठी केंद्र शासनाने निर्यातदारांकरिता निर्यात प्रोत्साहन योजना (एमइआयएस) अंतर्गत ५ टक्के अनुदान जाहीर केले; पण या अनुदान योजनेचा लाभ वाहतूकदारांनी मागील महिन्यात पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे निर्यातदारांना घेता आला नाही.

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...