agriculture news in marathi, Nafed shopping centers issue | Agrowon

नाफेडच्या खरेदी केंद्रांवर सोयाबीनला 'माॅईश्चर'चा खोडा
माणिक रासवे
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. परंतु सोयाबीनमधील माॅईश्चरचे प्रमाण १४ ते १६ टक्के येत असल्यामुळे खरेदी होऊ शकत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी पैशाची तातडीची गरज असेलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.

परभणी : नाफेडमार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, सोयाबीनची शासकीय खरेदी केंद्रे कार्यान्वित केली जात आहेत. परंतु सोयाबीनमधील माॅईश्चरचे प्रमाण १४ ते १६ टक्के येत असल्यामुळे खरेदी होऊ शकत नाही. त्यामुळे दिवाळी सणासाठी पैशाची तातडीची गरज असेलेल्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीन विक्री करावी लागत आहे.

दरम्यान नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ११ खरेदी केंद्रांवर सोमवार (ता. १६) पर्यंत १,८२८ शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमाल विक्रीसाठी नोंदणी केली आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

सोमवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) या ठिकाणी सोमवारी (ता. १६) खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिंतूर येथे माजी खासदार गणेश दुधगावकर, विजय खिस्ते, संजय भांबळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी के. जे. शेवाळे यांच्या उपस्थितीत काटा पूजन करून खरेदी केंद्राचे उद्घघाटन करण्यात आले.

या केंद्रावर मूग, उडिदाची आवक नाही. परंतु सोयाबीनमध्ये १४ ते १६ टक्के आर्द्रता आढळून येत असल्यामुळे ते नाफेडच्या निकषात बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना १२ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता असलेल्या सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात करावी लागत आहे.

आर्द्रतेच्या प्रमाणानुसार व्यापारी २००० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करत आहे. दिवाळी सणांसाठी अनेक शेतकऱ्यांना पैशाची गरज असल्यामुळे हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे.

दरम्यान, सोमवार (ता.१६) पर्यंत नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील केद्रावर ४०२ शेतकऱ्यांनी, बिलोली येथे १९५, धर्माबाद येथे ५१० शेतकऱ्यांनी एकूण ११०७, परभणी जिल्ह्यातील परभणी येथे ३९ शेतकऱ्यांनी, जिंतूर येथे ५, सेलू येथे ३०, मानवत येथे २३, गंगाखेड येथे ६ शेतकऱ्यांनी एकूण १०३ शेतकऱ्यांनी, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे ५५० शेतकऱ्यांनी, जवळा बाजार येथे १८, वसमत येथे ५० शेतकऱ्यांनी एकूण ६१८ शेतकऱ्यांनी तीन जिल्ह्यात एकूण  १,८२८ शेतकऱ्यांनी हमीभावाने शेतमाला विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांनी केंद्रावर सोयाबीन विक्रीस आणताना १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रता असलेले, काडीकचरा विरहित, एफएक्यू प्रतीचे सोयाबीन घेऊन यावे, अन्यथा गैरसोय होऊ शकते, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड (नांदेड) आणि के. जे. शेवाळे (परभणी) यांनी सांगितले.

इतर बातम्या
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
सोलापूर विद्यापीठ उभारणार कृषी पर्यटन...सोलापूर  : सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हिरज...
नाशिक जिल्ह्यातील सहा धरणे कोरडीनाशिक : जिल्ह्याला एकीकडे पावसाने हुलकावणी...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावांची...नाशिक : मॉन्सूनचे आगमन होऊनही नाशिक विभागातील...
कर्जमाफीचा पुन्हा बॅंकांनाच फायदा ः...सोलापूर ःशेतकऱ्यांना द्यावयाच्या कर्जमाफीचा...
कर्जमाफीच्या याद्या बॅंकेबाहेर लावापरभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापूर बाजार समिती निवडणूकीत...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...
सांगलीतील दुष्काळी भागात दूध संकलन घटलेसांगली : जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतीबरोबर...
माॅन्सूनची प्रगती शनिवारनंतर ?पुणे : जवळपास आठवडाभरापासून नैऋत्य मोसमी...
`एचटीबीटी` कापूस बियाण्याच्या...पुणे : बोंड अळीला प्रतिकारक म्हणून चढ्या...
पुणे विभागात ७० टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : मॉन्सून दाखल झाल्यानंतरही समाधानकारक...
परभणी विभागात महाबीजचे ३० हजार हेक्टरवर...परभणी : महाबीजच्या परभणी विभागांतर्गत येणाऱ्या...
मराठवाड्यातील ३२ मध्यम प्रकल्पांतील...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ३२ मध्यम...
तीन जिल्ह्यांत एक लाख २० हजार हेक्टरवर... नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
रत्नागिरीत साडेसहा हजार हेक्‍टरवर भात...रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील ६६६४...