agriculture news in marathi, Nafed Urud procurement complaint filed against three | Agrowon

उडीद खरेदीत घोळप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

बुलडाणा : नाफेडच्या खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत घोळ समोर येऊ लागला असून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला अाहे. पणन अधिकाऱ्याच्या तक्रारीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर चिखली तसेच बुलडाणा येथे उडीद खरेदीमध्ये मोठा घोळ समोर येण्याची चिन्हे अाहेत. 

बुलडाणा : नाफेडच्या खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत घोळ समोर येऊ लागला असून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला अाहे. पणन अधिकाऱ्याच्या तक्रारीविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला. नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर चिखली तसेच बुलडाणा येथे उडीद खरेदीमध्ये मोठा घोळ समोर येण्याची चिन्हे अाहेत. 

उडीद खरेदीत गोंधळ झाल्याची तक्रार स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. त्यासाठी उपनिबंधकांनी चौकशी समितीचे गठण करून चौकशी सुरू केली आहे. बुलडाणा येथील खरेदी केंद्रावर तिघांनी २९ डिसेंबर २०१७ पूर्वी शासकीय उडीद खरेदीत गैरप्रकार करून शासनाची तीन लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब समोर अाली अाहे. एकाच सातबाऱ्यावर दोन ठिकाणी उडीद विक्री झालेली अाहे. या प्रकरणी मार्केटिंग अधिकारी पी. एस. शिंगणे यांनी बुलडाणा पोलिसांत दोन दिवसांपूर्वी फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी किन्होळा येथील तिघांविरुद्घ गुन्हा दाखल केला. 

या प्रकरणी सुरवातीच्या टप्प्यात तिघांविरुद्ध गुन्हे दाखल झाले अाहेत तरी काही मोठे व्यापारी अद्यापही दूरच अाहेत. शेतकऱ्यांचे सातबारे घेऊन दोन-दोन केंद्रावर उडीद विकल्या गेला अाहे. खुल्या बाजारात कमी भावात उडीद खरेदी करून शासनाला हमीभावाने विकल्या गेला. यामुळे शासनाचे संगनमताने लाखोंचे नुकसान करण्यात अालेले अाहे. अद्याप जिल्हा उपनिबंधकांची चौकशी सुरु असून त्यात काही जणांची नावे लवकरच पुढे येणार अाहेत.  

नाफेड खरेदीत घोळच घोळ
बुलडाणा जिल्ह्यात नाफेडच्या खरेदीत विविध केंद्रांवर घोळ झाले अाहेत. अाता चिखली, बुलडाण्यात उडीद विक्रीतील गौडबंगाल समोर येत असून यापुर्वी संग्रामपूर, शेगाव येथील खरेदी केंद्रावर तूर विक्रीत प्रचंड घोळ झालेले अाहेत. संग्रामपूर, शेगावमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल झालेले असून काहींना अद्यापही जामीन मिळू शकलेला नाही. अाता हे उडीद प्रकरण कुठले वळण घेते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या अाहेत.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...