agriculture news in Marathi, NAFED will procured onion in lasalgaon, Maharashtra | Agrowon

‘नाफेड’ करणार लासलगावात कांदाखरेदी
ज्ञानेश उगले
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

नवीन कांदा येण्यास अजून दीड महिन्याचा अवधी आहे. या स्थितीत कांद्याची आवक कमी झाली असून मागणी वाढली आहे. ‘नाफेड’च्या कांदाखरेदीमुळे बाजारातील स्पर्धा वाढणार असून त्याचा कांद्याचे दर स्थिर राहण्यास उपयोग होईल.
- नानासाहेब पाटील, संचालक-नाफेड
 

नाशिक : दिल्लीमध्ये ३५ ते ४० रुपये किलो भावाने कांदा खरेदी करावा लागत असल्याने लासलगावमधून स्थानिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिल्लीकरांसाठी कांदा खरेदी करण्याचे ‘नाफेड’ने ठरवले आहे, अशी माहिती ‘नाफेड’चे संचालक नानासाहेब पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, की नुकतीच ‘नाफेड’च्या संचालक मंडळाची मुंबई येथे बैठक झाली. दिल्लीसाठी लासलगाव येथून कांदा खरेदी करुन तो पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. नवीन कांदा येण्यास अजून दीड महिना अवधी लागणार आहे. या स्थितीत दिल्लीतील ग्राहकांना कांदा उपलब्ध व्हावा यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 

पावसामुळे खरिपातील कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यातच खरिपातील पोळ कांद्याची आवक महिन्याने पुढे ढकलली गेली. सद्यस्थितीत बाजारपेठेत विकला जाणारा कांदा हा साठवणुकीतील उन्हाळ हंगामातील आहे. हा कांदा आणखी पंधरा दिवस बाजारपेठेत विक्रीसाठी येईल, इतपत शिल्लक आहे. मात्र हा कांदा संपत असताना पोळ कांदा बाजारात येणार नसल्याने किमान महिनाभर कांद्याला चांगला भाव मिळण्याची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून उन्हाळ कांद्याला मागणी आहे. दिवाळीच्या सुटीनंतर लिलाव सुरू झाले असले, तरीही प्रत्यक्षात कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पाठवण्यास सुरवात झाली नाही. ती लवकरच होईल. 

चांगल्या दराची शक्यता
गुजरातमध्ये नवीन कांद्याचे पीक चांगले आहे. राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली असली, तरीही नवीन कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास आणखी तीन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित आहे. कर्नाटकमध्ये सुरवातीला कमी पाऊस असल्याने नवीन कांद्याचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नुल भागातील कांदा संपत आला आहे. मध्य प्रदेशात रांगडा (लेट खरीप) कांद्याचे उत्पादन मोठे होत असले, तरीही हा कांदा बाजारात येण्यास १५ डिसेंबर उजाडणार आहे. ही सारी परिस्थिती कांद्याला चांगला भाव मिळण्यास अनुकूल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया
बाजारपेठेत १५ ते १६ रुपये किलो भावाने कांदा विकत मिळत असताना दिल्लीसाठी कांदा खरेदी केला जावा, अशी सूचना ‘नाफेड’ला केली होती. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. आता कांद्याचे भाव वाढू लागले असताना ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी करून पाठवा, असे सांगण्यास सुरवात झाली.

- चांगदेवराव होळकर , माजी संचालक, नाफेड

इतर बातम्या
चाळीतल्या कांद्याचे काय होणार?कांद्यास जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिकालहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे...
नांदेड जिल्ह्यात ६५ हजार हेक्टरवरील...नांदेडः गेल्या आठवड्यामध्ये झालेली अतिवृष्टी,...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार...इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
‘भूजल’विरोधात आंदोलनाचा पवित्रालखमापूर, जि. नाशिक : शासनाने नव्याने भूजल अधिनियम...
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...