agriculture news in marathi, nafed will stop purchasing black gram, green gram | Agrowon

नाफेडची मूग, उडीद खरेदी अाजपासून बंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

अकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या मूग, उडीद, सोयाबीनला हमीभावानुसार दर मिळावा या उद्देशाने नाफेडमार्फत खरेदी सुरू करण्यात अाली. यापैकी मूग व उडदाची खरेदी बुधवार (ता. १३) नंतर नोंदणी करणाऱ्यांसाठी राज्यभरात बंद करण्यात अाली अाहे. यातारखेपूर्वी ज्यांनी नोंदणी केली व माल खरेदी केंद्रावर अाणून ठेवला अशांची मोजणी केली जाणार असल्याचे नाफेडतर्फे सांगण्यात अाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अकोला : या हंगामात उत्पादित झालेल्या मूग, उडीद, सोयाबीनला हमीभावानुसार दर मिळावा या उद्देशाने नाफेडमार्फत खरेदी सुरू करण्यात अाली. यापैकी मूग व उडदाची खरेदी बुधवार (ता. १३) नंतर नोंदणी करणाऱ्यांसाठी राज्यभरात बंद करण्यात अाली अाहे. यातारखेपूर्वी ज्यांनी नोंदणी केली व माल खरेदी केंद्रावर अाणून ठेवला अशांची मोजणी केली जाणार असल्याचे नाफेडतर्फे सांगण्यात अाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

शासनाने हंगामात मूग, उडीद, काढणी सुरू झाल्यानंतर हमीभावाने खरेदीसाठी तालुका स्तरावर केंद्र सुरू केले. अनेक दिवस अार्द्रता व इतर कारणांनी हा शेतमाल रिजेक्ट झाला. अकोला व वाशीम जिल्ह्यात मंगळवार (ता. १२) पर्यंत मुगाची १४ हजार २८७ क्विंटल, तर उडदाची ५७ हजार ४५० क्विंटल खरेदी झाली होती. बुधवारी सायंकाळपासून खरेदी थांबवण्यात अाली.

ज्या शेतकऱ्यांनी मूग व उडीद विक्रीसाठी रविवार (ता. १०) पर्यंत नोंदणी केली अशांना मोबाईलवर मेसेज देण्यात अाले अाहेत. त्यांचा शेतमाल बुधवारी सायंकाळपर्यंत खरेदी केंद्रावर अाला असेल तसेच ज्यांचे मोजमाप व्हायचे असेल, असा मूग व उडीद मोजून घेतला जाणार अाहे; मात्र ज्यांनी नोंदणी केली नाही, अशांचा शेतमाल नाफेडतर्फे हमीभावाने खरेदी केला जाणार नसल्याचे सांगण्यात अाले.

अकोल्यातील खरेदी (११ डिसेंबरपर्यंत)

मूग १३५९२ क्विंटल
उडीद २५४८० क्विंटल
सोयाबीन ७७४६ क्विंटल

वाशीम जिल्ह्यातील खरेदी

मूग ६९३ क्विंटल
उडीद ३१९७० क्विंटल
सोयाबीन ४११५ क्विंटल

 

इतर ताज्या घडामोडी
ऊस टोळी देण्‍याच्‍या आमिषाने फसवणूकसांगली - ऊस तोड टोळी पुरवण्याच्या आमिषाने शेतकरी...
ससून डॉक मत्स्योद्योग सहकारी संस्थेची...मुंबई ः रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावात खलाशी...
भंडारा जिल्हा परिषदेचा गड काँग्रेस-...भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश...
रविकांत तुपकरांची लाेकसभेसाठी माढामधून...अकाेला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलख मैदानी...
कायदा हातात घेण्याची वेळ आणू नकाउस्मानाबाद : आम्ही कायदा हातात घेत नाही, तशी...
साताऱ्यात हरभऱ्याची साडेसत्तावीस हजार...सातारा: हरभऱ्याचा फायदेशीर ठरणारा बिवड तसेच...
साताऱ्यात काळा घेवडा २५० ते ३५० रुपये...सातारा  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
जळगाव येथे तुरीला मिळतोय हमीभावापेक्षा...जळगाव ः तुरीचे उत्पादन यायला सुरवात झाली, तरीही...
परभणी, हिंगोलीत सात लाख क्विंटल कापूस...परभणी : राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाच्या...
पाणीटंचाईमुळे आटपाडीतील रब्बी पिके धोक्...सांगली : आटपाडी तालुक्‍यात पाणीटंचाईमुळे रब्बी...
कृषी सल्ला : रब्बी भुईमूग, मोहरी, आंबा...भुईमूग ः  रब्बी उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी...
माहिती तंत्रज्ञानाचा वापर 'कृषी'त हवासोलापूर : "शेतकऱ्यांची ज्ञान, तंत्रज्ञान...
विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स....पुणे : महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती आणि...
वाटाणा पीक सल्लारब्बी हंगामात भरपूर आर्थिक उत्पन्न देणारे वाटाणा...
अपरिक्व नवीन आडसाली उसाला तुराकोल्हापूर : यंदा नुकत्याच लागवड केलेल्या आडसाली...
जतमधील शेतीपंपांना अवघा चार तासच...सांगली  ः जत तालुक्‍यात परतीचा पाऊस...
सातारा जिल्ह्यात ३९ लाख टन उसाचे गाळपसातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप...
चार जिल्ह्यांत तलाव ठेक्‍यातून अडीच...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
दर्जेदार कांदा उत्पादनासाठी फर्टिगेशन...कांदा उत्पादनासाठी पाणी आणि खताचे नियोजन अत्यंत...
पुणे विभागात गव्हाची एक लाख ६६ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाची पेरणी उरकली...