नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा बँकेप्रमाणे तंत्रज्ञान

नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा बँकेप्रमाणे तंत्रज्ञान
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा बँकेप्रमाणे तंत्रज्ञान

पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गावानिहाय असलेल्या विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंतचे कर्ज धोरण राबवित आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पीक कर्जाचे वितरण केले जाते. हे शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असून, असेच आधुनिक तंत्रज्ञान नागालँडमध्ये राबविणार असल्याचे मत नागालँड राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष टेमजन टॉय यांनी व्यक्त केले. 

नागालँड राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ व अधिकारी बँकेच्या अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने पुण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस बुधवारी (ता. २०) भेट दिली. या वेळी शिष्टमंडळात नागालँंड राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष केलिया, बहरूल तालुकदार यांच्यासह नागालँड राज्य बँकेचे संचालक व अधिकारी आले होते. याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, उप सरव्यवस्थापक संजय शितोळे, संजय वाबळे, विजय पवार आदी उपस्थित होते. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपसरव्यवस्थापक संजय शितोळे यांनी बँकेत नाबार्डच्या मार्गदर्शन सूचनेनुसार सुरू केलेल्या प्राथमिक शेती सहकारी संस्था विकास कक्षाच्या स्थापनेपासूनच्या कामकाजाचा व त्याचा सहकारी सक्षमीकरणावर झालेला सकारात्मक परिणाम याबाबत माहिती दिली. तसेच प्रशासकीय कामकाज, शाखांचा विस्तार, मनुष्यबळ, नवीन तंत्रज्ञान याबाबतची माहिती दिली. 

पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी राज्यातील बँकेचे त्रिस्तरीय पत संरचनेमधील कार्य, तसेच बँकेची आर्थिक सद्यस्थिती व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बँकेचे योगदान यासंबंधी माहिती दिली. याशिवाय नागालँडमध्ये कर्जाचे द्विस्तरीय पतसंरचनेमध्ये नागालँड राज्य सहकारी बँकेचे कार्य, आर्थिक स्थिती यावर चर्चा करण्यात आली. या वेळी बँकेचे उपसरव्यवस्थापक संजय वाबळे यांनी प्रास्तविक करून आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com