नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५०० रुपये

नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५०० रुपये
नगरला चिंच प्रतिक्विंटल ७००० ते १३५०० रुपये

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अन्य भुसार मालाची आवक कमी झाली आहे. बाजार समितीत गेल्या आठवडाभरात ८ हजार ११२ क्विंटलची आवक झाली. चिंचेला ७००० ते १३५०० रुपये दर मिळाला. गावराण ज्वारीचीही अजून फारशी आवक सुरू झालेली नाही. 

रब्बीची पिके निघाली असली तरी यंदा दुष्काळाचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या फक्त चिंचेचीच जोरात आवक होत आहे. गावराण ज्वारीची २२४ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला २५०० ते ३२५० रुपये दर मिळाला. गव्हाची २७९ क्विंटलची आवक झाली. गव्हाला १९०० रुपये दर मिळाला. 

तुरीची १३७ क्विंटलची आवक झाली व ४५७५-५००१ रुपये दर मिळाला. हरभऱ्याची १४१ क्विंटलची आवक झाली व ३३५१-४१०० रुपये दर मिळाला. लाल मिरचीची ६५ क्विंटलची आवक झाली व ७५०० ते ९१०० रुपये दर मिळाला. गूळ डागाची १११० आवक होऊन २६०० ते २७०० रुपये दर मिळाला. मुगाची १५५ क्विंटलची आवक होऊन ४००० ते ५१५१ रुपये दर मिळाला. मोहरीची ५ क्विंटलची आवक होऊन ३८०० रुपये दर मिळाला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com