भंडारदरा जलाशय तिसऱ्यांदा भरून वाहू लागला

भंडारदरा जलाशय तिसऱ्यांदा भरून वाहू लागला
भंडारदरा जलाशय तिसऱ्यांदा भरून वाहू लागला

अकोले, जि. नगर : मुळा, प्रवरा, आढळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, भंडारदरा जलाशय पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा भरून वाहू लागला आहे. 'स्पिल वे'मधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून, अतिवृष्टीमुळे भात खाचरात पाणी साचल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भंडारदरा जलाशयातून ५६७३ क्युसेक्स, वाकी धरणातून २१९९ क्युसेक्स, निळवंडे धरणातून १९,८७५ क्युसेक्स, मुळा धरणातून ९००० क्युसेक्स व अधला धरणातून ११०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून पाण्याचा जोर वाढला असून, हा विसर्ग हळूहळू वाढवण्यात येत आहे. भंडारदरा पूस ९५ मिलीमीटर, निळवंडे ८३, अधला ४५, रतनवाडी १२२, घाटघर ८३, पांजरे ९७, वाकी ७५, अकोले ९५ मिलीमीटर झाला असून, रस्ते बंद झाले आहेत.

सर्वच ठिकाणची वाहतूक ठप्प झाली असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे बांधबंदिस्त फुटले आहे. अकोले तालुक्यात सर्वदूर पाउस पडत असून, मुळा व प्रवरा नदीला पूर आला आहे. रस्त्यावर व ओढ्यावर गुड्घाबर पाणी साचल्याने वाहतूक बंद आहेत, तर आदिवासी भागातील शाळांना सलग दोन दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com