नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची रिपरिप

नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची रिपरिप
नगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागात पावसाची रिपरिप

नगर ः नगर जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवार रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे खरिपाच्या काही पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अकोले तालुका वगळता अन्य भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस सुरूच असल्याने भंडारदरातून ३ हजार २५५, निळवंडेतून ६०३६ क्‍युसेकने विसर्ग सुरू असून, मुळात नदीतून मुळा धरणात ५ हजार ३२७ क्‍युसेकने पाणी येत आहे. त्यामुळे मुळाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.

नगर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाचे आगमन झाले. मात्र, जोरदार पाऊस नसून मूर पाऊस सुरू आहे. त्याचा खरिपाच्या पिकाला फायदा होत आहे. अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात चांगला पाऊस सुरू आहे. भंडारदरा, निळवंडे धरण भरलेले असून मुळातही बऱ्यापैकी पाणी जमा होत आहे.

अकोले तालुक्‍यातील पडणाऱ्या पावसावरच उत्तर भागातील शेती आणि अन्य बाबी अवलंबून असल्याने जिल्ह्याच्या अन्य भागात पाऊस नसला तरी अकोलेत पडणाऱ्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. नगर, राहुरी, कोपरगाव, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पाथर्डी तालुक्‍यात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मुळा धरणात आत्तापर्यंत जवळपास सत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे. घाटशीळ पारगाव, मांडओहळ, आढळा, सीना प्रकल्पात पाणी जमा होण्यासाठी मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. आज सकाळपर्यंत झालेला पाऊस असा ः घाटघर ः १०५, रतनवाडी ः ९५, पांजरे ः ४४, वाकी ः ३५, निळवंडे ः ७, भंडारदरा ः ४३, अकोले ः ५, आढळा ः ४, कोतुळ ः ६, संगमनेर ः ५, आश्‍वी ः ५, लोणी ः ५, श्रीरामपूर ः १५, देवळाली ः १२, मुळा ः १२, सोनगाव ः १०, नगर ः१०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com