agriculture news in marathi, in nagar due Electricity bills eighteen thousand agricultural connection cut | Agrowon

नगरमध्ये कृषिपंपांना वीजबिल थकबाकीचा झटका
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नगर : महावितरणच्या नाशिक परिमंडलात किमान चालू वीजबिल न भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केली जात आहे. त्यात आज रात्रीपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार ४९१ कृषिपंपांची वीज तोडण्यात आली. ही कारवाई थांबविणार नसल्याचे महावितरणचे वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विश्‍वनाथ निर्वाण यांनी सांगितले.

नगर : महावितरणच्या नाशिक परिमंडलात किमान चालू वीजबिल न भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केली जात आहे. त्यात आज रात्रीपर्यंत जिल्ह्यातील १८ हजार ४९१ कृषिपंपांची वीज तोडण्यात आली. ही कारवाई थांबविणार नसल्याचे महावितरणचे वित्त व लेखा विभागाचे व्यवस्थापक विश्‍वनाथ निर्वाण यांनी सांगितले.

कृषिपंप ग्राहकांच्या थकबाकीत नगर जिल्हा राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार कृषिपंप ग्राहकांकडे दोन हजार २८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कृषिपंपांजवळ २८ कोटी आठ लाख रुपयांची थकबाकी आहे. महावितरणच्या एकट्या ग्रामीण विभागाने (नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुका) साडेतीन हजार कृषिपंपांची वीज तोडली.

थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. महावितरणकडून कृषिपंपांना सवलतीच्या व नाममात्र दरात वीजपुरवठा केला जातो. मात्र, ही रक्कमही वसूल होत नाही व दुसरीकडे वीजखरेदी, पुरवठा यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती, सुरळीत वीजपुरवठा व कर्मचारी यावर खर्च करावा लागतो.

विजेच्या क्षेत्रातील उधारीचे दिवसही संपल्याने वीजबिलाची वेळच्या वेळी वसुली अनिवार्य झाली आहे. त्यादृष्टीने आता कृषिपंप ग्राहकांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत आकारण्यात आलेले चालू बिल (देयक) म्हणजेच दोन त्रैमासिक बिले न भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ही रक्कम तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...