agriculture news in marathi, Nagar in loksabha election will contest Rashtrawadi congress party | Agrowon

नगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नगर : नगर लोकसभा मतदारसंघ काॅँग्रेसकडे घेणार असल्याचे वक्तव्य  काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ९) जनआक्रोश यात्रेमध्ये केले होते. त्यावर, आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करणार आहेत. त्यातही ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा असतो, हे मागील वीस वर्षांत सर्वांना माहीत आहे. नगर राष्ट्रवादी तुलनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार आहे. दादांचा शब्द पक्का असल्याचा निर्वाळा ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

नगर : नगर लोकसभा मतदारसंघ काॅँग्रेसकडे घेणार असल्याचे वक्तव्य  काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ९) जनआक्रोश यात्रेमध्ये केले होते. त्यावर, आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करणार आहेत. त्यातही ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा असतो, हे मागील वीस वर्षांत सर्वांना माहीत आहे. नगर राष्ट्रवादी तुलनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार आहे. दादांचा शब्द पक्का असल्याचा निर्वाळा ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.

‘रयत’ संस्थेच्या कार्यक्रमासाठी पवार नगरला आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘राज्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देऊन, तातडीने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, सत्तारूढ असलेले नाकर्ते सरकार या गंभीर परिस्थितीत नियोजनासाठी तत्पर नसल्याचा आरोप पवार यांनी केला. शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्‍न ऐरणीवर आणत आहे. ते विकासाऐवजी नेहमीच भावनिक मुद्द्यांना पुढे करतात. त्यामुळे त्यांच्यात तारतम्याचा अभाव दिसत आहे. पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बीवरही संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत, आगामी ३१ जुलैपर्यंत पाणीसाठ्यांचे आरक्षण, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांसाठी छावण्या आदी उपाययोजनांचे नियोजन सरकारने तातडीने करायला पाहिजे. मात्र, राज्यात सत्तारूढ असलेल्या नाकर्त्या सरकारला याचे गांभीर्य नाही. संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्याची ठोस भूमिका घेतली होती; मात्र यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत राज्यातील लोकांना उजेडापासून वंचित राहावे लागत आहे. या भारनियमनाच्या विरोधात शुक्रवारी (ता. १२) राज्यभर राष्ट्रवादी  काॅँग्रेस महावितरण कार्यालयांत कंदील लावून आंदोलन करील, असा इशारा पवार यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम
पवार म्हणाले, ‘दुष्काळी स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा २०१९ नंतर मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. गुजरातमध्ये सर्व विरोधक एक झाले असते, तर गुजरात हातचे गेले असते. कर्नाटकात काय झाले हे देशाने पाहिले आहे. पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम असलेल्या राज्यकर्त्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर त्यांची स्थिती काय आहे हे कळेल.’

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
जळगावात आले प्रतिक्विंटल २१०० ते ४५००...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याची (...
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
ज्वारीस द्या संरक्षित पाणीसर्वसाधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी फुलोऱ्यात...
गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी...प्रकाश संश्लेषणामध्ये हरितलवक आणि हरितद्रव्य...
`जलयुक्त`ची कामे गतीने पूर्ण करा : डवलेबुलडाणा : जलयुक्‍त शिवार अभियानातंर्गत भूजल...
नगर जिल्ह्यात सव्वाचार लाख हेक्‍टर...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीच्या सरासरी...
सांगलीतील मध्यम, लघू प्रकल्पांत २३...सांगली ः जिल्ह्यातील ८४ मध्यम आणि लघू प्रकल्पांत...
नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाटनगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही...
सोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य :...नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या...
नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांच्या...नाशिक : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती...