agriculture news in Marathi, nagar in number of woman voter increase | Agrowon

मतदार यादीत वाढला महिलांचा टक्का
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मार्च 2019

नगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयापासून गावापर्यंत फेरी, मेळावे घेत जनजागृती अभियान राबविले. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्याच्या मतदार यादीत महिलांचा टक्का तब्बल दीड लाखाने वाढला आहे. विशेष म्हणजे यंदा वाढलेल्या मतदात्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक आहेत. त्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधी निवडताना महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

नगर : निर्दोष मतदार यादी तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महाविद्यालयापासून गावापर्यंत फेरी, मेळावे घेत जनजागृती अभियान राबविले. त्यामुळे मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्याच्या मतदार यादीत महिलांचा टक्का तब्बल दीड लाखाने वाढला आहे. विशेष म्हणजे यंदा वाढलेल्या मतदात्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला अधिक आहेत. त्यामुळे साहजिकच लोकप्रतिनिधी निवडताना महिलांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

निवडणूक शाखेतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण होत आली आहे. मागील अनेक निवडणुकांचा अनुभव पाहता, मतदार यादीमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण कमी असायचे. हा टक्का वाढवण्यात जिल्हा प्रशासनास यंदा यश आले. २०१४मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात ३१ लाख ५४ हजार ३८७ मतदार होते. त्यांत १६ लाख ६१ हजार ९७१ पुरुष व १४ लाख ९२ हजार ३५४ महिला होत्या. यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ३४ लाख २९ हजार ८८ मतदार मतदान करणार आहेत. या वर्षी मतदार दोन लाख ७४ हजार ७०१ने वाढले आहेत. या वाढलेल्या मतदारांमध्ये १७ लाख ८९ हजार ४५१ पुरुष, तर १६ लाख ३९ हजार ५०२ महिला मतदार आहेत.

मतदानाची टक्केवारी वाढणार?
नवमतदार व त्यात महिला मतदार वाढविण्यात निवडणूक शाखेला यश आल्याचे यंदाच्या आकडेवारीवरून दिसते. पुरुषांपेक्षा महिला मतदार मतदानाबाबत गंभीर असल्याचेही गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून दिसते. यंदा महिला मतदार वाढल्याने मतदानाची टक्केवारीही वाढणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मतदानाची टक्केवारी वाढली तर त्याचा फायदा नेमका कोणाला होईल, हे पाहणेही औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...