agriculture news in Marathi, Nagar on top in application of Horticulture, Maharashtra | Agrowon

फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वल
टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

नगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांच्या लाभासाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत अर्ज वाढले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मात्र गेल्यावेळीपेक्षा यंदा दहा हजार अर्ज कमी आले आहेत. सर्वात कमी अर्ज नंदुरबारमध्ये आलेले आहेत. सोडतीने लाभार्थी निवड होणार आहे.

नगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांच्या लाभासाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत अर्ज वाढले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मात्र गेल्यावेळीपेक्षा यंदा दहा हजार अर्ज कमी आले आहेत. सर्वात कमी अर्ज नंदुरबारमध्ये आलेले आहेत. सोडतीने लाभार्थी निवड होणार आहे.

राज्यात ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. २०१९-२० मध्ये राबविण्यात येत आहे. यातून सुमारे १९ विविध योजनांचा शेतकऱ्यांना अनुदानावर लाभ दिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून शासन लाभार्थी निवडण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. यंदाही ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ५ एप्रिल ही अंतिम तारीख होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नसल्याने मुदतवाढ करण्याची मागणी वाढत होती.

त्यानुसार २२ एप्रिल मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विविध योजनांसाठी तब्बल ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. सोडत काढून लाभार्थी निवड केली जाणार आहे. सर्वाधिक अर्ज कांदाचाळीसाठी आहेत. सर्वात कमी १२५९ अर्ज नंदुरबामधून आलेले आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध विविध योजनांसाठी अर्जाची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेतीन लाख अर्ज आलेले आहेत.  

या योजनांसाठी केले आहेत अर्ज
रोपवाटिका, अळिंबी उत्पादन प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेतीसाठी हरितगृह, ट्रॅक्‍टर (२० अश्‍वशक्ती), पीक संरक्षक उपकरणे, एकात्मिक पॅक हाउस, शीतगृह, पूर्वशीतकरण ग्रह, शीतखोली, एकात्मिक शीतसाखळी, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पूर्वशीतकरणगृह व शीतखोली (सोलर पॉवरसह) प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन, मधुमक्षिकापालन वसाहत संच.

जिल्हानिहाय आलेले अर्ज असे
नगर ः ६४५८७, अकोला ः ५१७९, अमरावती ः ५०४९ औरंगाबाद ः ६०३८९, बीड ः २०६७८, भंडारा ः ३२४६, बुलढाणा ः ९१३४, चंद्रपूर ः ६०८१, धुळे ः ४५८२, गडचिरोली ः २८२७, गोंदिया ः ३४८९, हिंगोली ः ३५८९, जळगाव ः ६८८७, जालना ः ५६६९९, कोल्हापूर ः १६४९, लातूर ः ४४४९, नागपूर ः ७७३१, नांदेड ः ४४६३, नंदुरबार ः १२५९, नाशिक ः २६२२४, उस्मानाबाद ः १३००६, पालघर ः २५२३, परभणी ः १४२०५, पुणे ः ९६८३, रायगड ः २२२१, रत्नागिरी ः २८८२, सांगली ः १५४९३, सातारा ः ४५३६, सिंधुदुर्ग ः १३१४, सोलापुर ः २६१०९, ठाणे ः १२७५, वर्धा ः ४७०६, वाशीम ः ३७९७, यवतमाळ ः ४६२३.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...