फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वल

फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वल
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वल

नगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध १९ योजनांच्या लाभासाठी राज्यभरातून तब्बल २ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ७८ हजार १६९ अर्ज आले आहेत. सर्वात कमी अर्ज ठाणे जिल्ह्यातून आले असून, त्याची संख्या अवघी ४२ असल्याचे दिसते. शनिवारी (ता.३०) ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपत असून, आता एकाच वेळी सोडतीने लाभार्थी निवड होणार आहे. राज्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१८-१९ मध्ये राबविण्यात येत आहे. यातून सुमारे १९ विविध योजनांचा शेतकऱ्यांना अनुदानावर लाभ दिला जातो. गेल्या वर्षीपासून शासन लाभार्थी निवडण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. यंदाही ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी २० जून ही अंतिम तारीख होती. २० जूनपर्यत १ लाख २५ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. मात्र अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नसल्याने मुदतवाढ करण्याची मागणी वाढत होती. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी कृषी संचालकांकडे मुदतवाढीची मागणी केली. होती. त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदत वाढवून ती ३० जून करण्यात आली होती. काल (शनिवारी) अर्ज करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आतापर्यंत कृषी विभागाकडे तब्बल २ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक नगर जिल्ह्यामधून अर्ज आले आहे. आता यातून एकाचवेळी राज्यभर सोडत काढून लाभार्थी निवड केली जाणार आहे. सर्वाधिक अर्ज कांदाचाळीसाठी आहेत.

या योजनांसाठी केले आहेत अर्ज रोपवाटिका, आळिंबी उत्पादन प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेतीसाठी हरितगृह, ट्रॅक्‍टर (२० आश्‍वशक्ती), पीक संरक्षक उपकरणे, एकात्मिक पॅक हाऊस, शीतगृह, पूर्व शीतकरण ग्रह, शीतखोली, एकात्मिक शीतसाखळी, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पूर्वशीतकरणगृह व शीतखोली (सोलर पॉवरसह) प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन, मधुमक्षिका पालन वसाहत संच. वीस जिल्ह्यांत सामूहिक शेततळे सामूहिक शेततळे या घटकाचा लाभ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, जळगाव तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गंडचिरोली, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यामध्ये दिला जात आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल. जिल्हानिहाय आलेले अर्ज असे नगर ः ७८१६९, अकोला ः ७४५, अमरावती ः ३३४, औरंगाबाद ः २४७६२, बीड ः १५५४९, भंडारा ः ५००, बुलढाणा ः ७६२८, चंद्रपूर ः २५९, धुळे ः ५७४७, गडचिरोली ः १४५, गोंदिया ः ५४६, हिंगोली ः १५७९, जळगाव ः ४०७०, जालना ः २३५९६, कोल्हापूर ः ७६९, लातूर ः ५३६३, नागपूर ः १५३३, नांदेड ः १४३८, नंदुरबार ः ९२४, नाशिक ः ४३९४३, उस्मानाबाद ः १०७९२, पालघर ः ७७, परभणी ः ६७७३, पुणे ः १३३२३, रायगड ः ७७, रत्नागिरी ः ५७, सांगली ः ११५९४, सातारा ः ३९७५, सिंधुदुर्ग ः ८१, सोलापुर ः १४८४७, ठाणे ः ४२, वर्धा ः १८८, वाशिम ः २३८६, यवतमाळ ः ३२८१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com