agriculture news in Marathi, nagar wins in agri department sport, Maharashtra | Agrowon

कृषी विभागाच्या क्रीडा स्पर्धेत नगरला सर्वसाधारण विजेतेपद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पुणे ः कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य कृषी सहयक संघटना यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय कला व क्रीडा रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शनिवार (ता. १०) ते सोमवार (ता. १२) दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेत अहमदनगरच्या कृषी विभागाच्या संघाने ४३ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर रत्नागिरी संघाने ४१ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले. 

पुणे ः कृषी विभाग व महाराष्ट्र राज्य कृषी सहयक संघटना यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय कला व क्रीडा रत्नागिरी जिल्ह्यातील दापाेली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात शनिवार (ता. १०) ते सोमवार (ता. १२) दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेत अहमदनगरच्या कृषी विभागाच्या संघाने ४३ गुण मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर रत्नागिरी संघाने ४१ गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले. 

क्रिकेटमध्ये पुरुषांच्या गटामध्ये बीड संघाने विजेतेपद, लातूर संघाने उपविजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये नगर संघाने विजेतेपद, रत्नागिरी संघाने उपविजेते पद पटकावले. खो-खोच्या क्रीडा प्रकारामध्ये महिला गटामध्ये पुणे संघाने विजेतेपद, नगर संघाने उपविजेते पद पटकावले. कबड्डीमध्ये पुरुष गटामध्ये कोल्हापूर संघाने विजेतेपद, ठाणे संघाने उपविजेतेपद पटकावले. महिला गटामध्ये रत्नागिरी संघाने विजेते पद पटकावले. हाॅलिबाॅलमध्ये पुरुष गटामध्ये सोलापूर संघाने विजेतेपद, नाशिक संघाने उपविजेते पद पटकावले.

याशिवाय गोळा फेक, धावणे, लांब उडी, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम हे क्रीडा प्रकार घेण्यात आले. तसेच कला प्रकारामध्ये पालघर संघाने तारफा नृत्याचे प्रात्यक्षिक दाखवून पहिला क्रमांक पटकावला. कोल्हापूर संघाने पोवडा दाखवून दुसरा क्रमांक मिळवला. यामध्ये कृषी आयुक्तालय, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या विभागांतील पुरुष १२६९, महिला २६९ असे एकूण १५३८ खेळाडू सहभागी झाले आहेत. या कला व क्रीडा स्पर्धा पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या होत्या. 

ठाणे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी विनयकुमार आवटे, रफिक नाईकवडी, दादाराम सप्रे, उमेश पाटील, बसवराज मास्तोळी, काशिनाथ तरकसे, पंडित लोणारे, अंकुश माने, आरीफ शहा, दीपक कुटे, बाळासाहेब मोरे, शिरीष जाधव, कांतिलाल पवार, रवींद्र सहाणे, समीर घुमे, राजकुमार डोंगरे यांनी मुख्य क्रीडा समन्वयक म्हणून काम पाहिले.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...