agriculture news in marathi, nagar zilha parishad to implement jalyukt shivar scheme, maharashtra | Agrowon

‘जलयुक्‍त’च्या कामासाठी नगर ‘झेडपी’चा प्रथमच पुढाकार
सूर्यकांत नेटके
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करण्यासाठी पहिल्यांदाच जिल्हा परिषदनेही पुढाकार घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या २४१ गावांत २५७ गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १४ कोटी ३२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 
 
दुष्काळात सर्वाधिक पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. पिण्यासाठीच पाणी मिळत नसल्याने शेतीचा प्रश्‍न त्याहून गंभीर झाला. शेतीचे मोठे नुकसान दुष्काळात झाले. त्यामुळे दुष्काळी गावे टॅंकरमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले गेले. अभियान यशस्वी करण्याची कृषी विभागावर प्रमुख जबाबदारी असली, तरी शासनाच्या इतर योजनांवरही कामे करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
 
गेल्या दोन वर्षांत पाणी अडवून ते जिरवण्यावर भर देत लोकसहभागातून गाळ काढण्यासह अन्य कामांना या योजनेत प्राधान्य दिले गेले. दोन वर्षांनंतर या कामाचे प्रभावी परिणाम दिसू लागले आहेत. योजनेतून राज्यात सर्वाधिक तलावातील गाळ नगर जिल्ह्यामध्ये काढला गेला आहे.
 
यंदा भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार दहा मीटरवर गेलेली पाणीपातळी आता सात मीटरने वर आली आहे. दोन वर्षांपूर्वी जेवढा पाऊस झाला होता, तेवढाच पाऊस यंदाही झालेला आहे. मात्र, यंदा पाणी अडवल्याचे प्रमाण अधिक असल्याने पाणीपातळी उंचावण्याला मदत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
 
असे असले तरी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात जिल्हा परिषेदचा फारसा सहभाग तीन वर्षांच्या काळात दिसला नाही. ग्रामीण भागाच्या विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे. मात्र, जलयुक्त शिवार योजनेबाबत फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात अभियानातून कामाचे नियोजन केले आहे. जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या २४१ गावांत २५७ दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.
 
या कामांवर सुमारे १४ कोटी ३२ लाख २६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या दुरुस्तीच्या कामामुळे २३ हजार ९३९ टीसीएम पाणीसाठा होईल. दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अनुराधा नागवडे, कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी पुढाकार घेतला आहे. 

इतर ताज्या घडामोडी
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...