agriculture news in Marathi, Nagar Zilla Parishad's annual budget of Rs 44 crores | Agrowon

नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा ४४ कोटी ३७ लाख २४ हजार ४२३ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा अर्थसंकल्प ४९ कोटी १९ लाख ७७ हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे. यात यंदा कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी पावणेपाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा ४४ कोटी ३७ लाख २४ हजार ४२३ रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा अर्थसंकल्प ४९ कोटी १९ लाख ७७ हजार पाचशे कोटी रुपयांचा आहे. यात यंदा कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी पावणेपाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

जिल्हा परिषदेत सोमवारी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सर्व साधारण सभेत अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीत काही बदल झाले आहेत. मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत, समितीचे दौरे, शाळा निर्लेखन, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. कृषी व पशुसंवर्धनसाठी पावणेपाच कोटींसह शिक्षण विभागाला एक कोटी सतरा लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाला अकरा कोटी, लघू पाटबंधारे विभागासाठी एक कोटी, ग्रामपंचायत विभागासाठी तीन कोटी, समाज कल्याणसाठी तीन कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास हजारांची मदत दिली जाते. मात्र अनेक आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या किचकट निकषामुळे मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. 

त्यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीतून पैसे द्यायचे असतील तर आपल्या पातळीवर निकष ठरवून मदत करावी, अशी मागणी सुनील गडाख, राजेश परजणे, शरद नवले, सीताराम राऊत, संदेश कार्ले, हर्षदा काकडे, जालिंदर वाकचौरे, तुकाराम कातोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केली. कृषी समितीने निकषांवर निर्णय घ्यावा, असे शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...