agriculture news in Marathi, In Nagpur, potato's maximum 2693 quintals arrivals | Agrowon

नागपुरात बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍विंटल आवक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८) बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. मध्य प्रदेशातूनदेखील बटाट्याची वाढती आवक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बुधवारी बटाट्याचे दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. 

नागपूर ः कळमणा बाजार समितीत बुधवारी (ता. ८) बटाट्याची सर्वाधिक २६९३ क्‍विंटल आवक नोंदविण्यात आली. मध्य प्रदेशातूनदेखील बटाट्याची वाढती आवक असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बुधवारी बटाट्याचे दर १४०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. 

बाजारात सरबती गव्हाची ३२२ क्‍विंटल आवक झाली. २५०० ते २९०० रुपये क्‍विंटलचा दर गव्हाचा होता. २२०० ते २५०० रुपये क्‍विंटल दर असलेल्या तांदळाची आवक ४२ क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. हरभऱ्याचे दर ३६०० ते ४०८० रुपये क्‍विंटल होते. ८७४ क्‍विंटल इतकी हरभरा आवक झाली. जवसाची जेमतेम पाच क्‍विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. जवसाचे दर ३८०० ते ४२०० रुपये क्‍विंटल होते. भुईमूग शेंग ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटल होती, तर आवक ४० क्‍विंटलची झाली. 

मोठ्या आकाराच्या मोसंबी फळाला १५०० ते २००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. आवक ३५० क्‍विंटलची होती. मध्यम आकाराच्या मोसंबी फळाचे दर १२०० ते १४०० रुपये क्‍विंटल तर लहान आकाराच्या फळाचे दर ८०० ते १००० रुपये होते. केळीचे व्यवहार ४५० ते ५०० रुपये क्‍विंटलने झाले. १०१ क्‍विंटल इतकी आवक केळीची नोंदविण्यात आली. सफरचंदाची आवक २८ क्‍विंटल इतकी झाली. सफरचंदाचे दर ११ हजार ते १३ हजार रुपये क्‍विंटल होते. ३००० ते ४००० रुपये क्‍विंटल असा दर असलेल्या द्राक्षाची आवक २३ क्‍विंटल झाली. 

लाल कांद्याची आवक ११६२ क्‍विंटल झाली तर दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटल होते. ६०० ते ३००० रुपये क्‍विंटल असा दर असलेल्या लसणाची आवक ७४२ क्‍विंटल झाली. ८०० ते १२०० रुपये क्‍विंटलने टोमॅटोचे व्यवहार झाले. भेंडीची आवक १४० क्‍विंटल तर दर १८०० ते २५०० रुपये क्‍विंटलचे होते. हिरव्या मिरचीचे दर १५०० ते २००० रुपये क्‍विंटल आणि आवक २२० क्‍विंटलची होती. ढोबळी मिरची ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटल आणि आवक १८० क्‍विंटल इतकी होती.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...