नागपूर विभागाची सात-बारा डिजिटायझेशनमध्ये आघाडी

तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अशा तीन टप्प्यांवर पडताळणी करून ऑनलाइनची प्रक्रिया त्रुटीरहीत करण्यासाठीचे काम झाले. त्यामुळे ऑनलाइन सात - बारा बिनचूक उपलब्ध होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीचे देखील ६० टक्‍के पूर्णत्वास गेले आहे. एकूणच डिजिटलायझेशनची प्रक्रिया ९९.२२ टक्‍के पूर्णत्वास गेली असून या प्रक्रियेत सहा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना ऑनलाइन सात -बारा काढण्याची सुविधा मिळेल. - अनुपकुमार, विभागीय आयुक्‍त, नागपूर.
अॅग्रो अजेंडा
अॅग्रो अजेंडा

नागपूर  : पूर्व विदर्भात येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये ६५ तालुके आणि आठ हजार ५८७ गावे आहेत. यामध्ये ३१ लाख ५० हजार ७ इतके सर्व्हे क्रमांक आहेत. यातील बहुतांश खातेदारांचे सात-बारा ऑनलाइन करण्यात यश आले असून त्याची टक्‍केवारी ९९.२२ आहे. वरोरा आणि चंद्रपूर तालुक्‍यातच तांत्रिक कारणामुळे हे काम प्रभावित झाले आहे.

एक ऑगस्टपासून ऑनलाइन सातबाराची उपलब्धता करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विभागात रेकॉर्ड ऑनलाइनची करण्याची बहुतांश प्रक्रिया झाली आहे, परंतु डेटा एका सर्व्हरवरून दुसऱ्या सर्व्हरवर ट्रार्न्सफर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही तारीख चुकण्याची शक्‍यता आहे. डेटा ट्रान्सफर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे काम केले जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबाराची उपलब्धता होणार आहे.

सध्या शेतकरी सात -बारा ऑनलाइन काढून त्यावर तलाठ्याची सही घेतात. परंतु या कारणामुळे कोठेही खरिप हंगामातील पीककर्ज वितरणाची प्रक्रिया बाधित झाल्याच्या तक्रारी नाहीत. महसूल प्रशासनाने या हंगामात काही जिल्ह्यांमध्ये दस्तऐवज थेट  शेतकऱ्यांना घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. गोंदिया, भंडारा जिल्हयात हे काम अतिशय प्रभावीपणे झाले. ऑनलाइन सातबाराची प्रक्रिया राबविण्यापूर्वी त्यावरील आक्षेप व त्रुटींचे वाचन झाले चंद्रपूर व वरोरा येथे ऑनलाइन सातबाराचे काम रखडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com