agriculture news in marathi, Nakhatwadi lake dray | Agrowon

नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखाली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

परभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून सर्वच प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. नखातवाडी (ता. सोनपेठ) तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. टाकळवाडी (ता. गंगाखेड) येथील तलावाने तळ गाठला आहे. उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे.

परभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून सर्वच प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होत आहे. नखातवाडी (ता. सोनपेठ) तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. टाकळवाडी (ता. गंगाखेड) येथील तलावाने तळ गाठला आहे. उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात येत आहे. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाईची समस्या उद्भवणार आहे.

रविवारी (ता. २१) जायकवाडी प्रकल्पांमध्ये ३३.७२ टक्के, येलदरी धरणांमध्ये ९.२० टक्के, सिद्धेध्वर धरणामध्ये २०.१४ टक्के, निम्न दुधना प्रकल्पामध्ये २०.१४ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पांमध्ये ७२ टक्के, मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये ६ टक्के, डिग्रस बंधाऱ्यामध्ये ५९.७१ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यामध्ये ५३.२६ टक्के, ढालेगांव बंधाऱ्यामध्ये ५०.४१ टक्के, मुळी बंधाऱ्यामध्ये ३.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला होता.

गेल्या आठवडाभरात जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये ३.३२ टक्के, येलदरी धरणातील पाणीसाठ्यात ०.१२ टक्के, सिद्धेश्वर धरणातील पाणीसाठ्यात १.८७ टक्के, करपरा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ३ टक्के, मासोळी धरणातील पाणीसाठ्यात २ टक्के, डिग्रस बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात १.७४ टक्के, मुद्दगल बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात ६.३२ टक्के, ढालेगांव बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात ७.३५ टक्के घट झाली आहे.२२ लघू तलावांमध्ये सरासरी ४० टक्के पाणीसाठा आहे. परंतु, नखातवाडी (ता. सोनपेठ) येथील लघू तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

टाकळवाडी (ता. गंगाखेड) तलावाने तळ गाठला आहे. यंदा जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमध्ये गतवर्षीएवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची समस्येची तीव्रता वाढणार आहे.

इतर बातम्या
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
शेतकऱ्यांचा आंदोलनानंतर आत्मदहनाचा...राशीन, जि. नगर : कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी...
सोलापुरात ‘स्वाभिमानी'चे उपोषणकर्ते...सोलापूर : गतवर्षीच्या हंगामातील थकीत एफआरपी...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीद्वारे...परभणी : उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
दर घसरल्याने कोल्हापुरात उत्पादकांकडून...कोल्हापूर : येथील बाजार समितीत सौदे सुरू असताना...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
बुलडाण्यातील ८ तालुके, २१ मंडळांत...बुलडाणा : कमी पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...