छाननीपूर्वीच नावे गायब
चंद्रकांत जाधव
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

चावडीवाचनानंतर कर्जमाफीचे अर्ज आता तालुका समितीकडे आले आहेत. तहसीलदार हे त्यासंबंधी कार्यवाही करतील. गुरुवारपर्यंत या अर्जांबाबतची दुरुस्ती, आक्षेप स्वीकारणे, अशी कार्यवाही होणार आहे. यानंतर तालुका समिती आपला अहवाल जिल्हा समितीकडे सादर करणार आहे.

जळगाव : कर्जमाफीसंबंधीच्या अर्जांबाबतचे वाचन करताना ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले, त्यांचीही नावे गायब झाली असल्याचे दिसून आले आहे. अनेक गावांतील मोठ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या किंवा गावांमध्ये चावडीवाचनानंतर असेच चित्र असल्याची स्थिती आहे. अद्याप छाननी झालेली नाही, त्यापूर्वी अर्ज दाखल करूनही यादीत नावे कशी आली नाहीत, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना आता पडला आहे. हा गोंधळ दूर करून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जावी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ज्या कर्जमाफीस पात्र थकबाकीदार किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केलेला नाही, त्यांनाही या योजनेतून लाभ मिळेल; परंतु केवळ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांनाच हा लाभ मिळू शकेल. अर्थातच सोसायटीच्या पात्र थकबाकीदार व नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सचिवांनीदेखील १ ते ६६ या नमुन्यांतर्गत शासनाला सादर केली आहे.

अनेक सोसायट्यांची ही माहिती तयार झाली असून, ती तालुका स्तरावर सहनिबंधक कार्यालयात सादर करण्यात आली आहे. सोसायट्या किंवा बॅंकांची माहिती व ऑनलाइन अर्ज यांची पडताळणी केल्यानंतर कर्जमाफीसंबंधीचा लाभ देण्यास सुरवात होईल. या प्रक्रियेला आणखी ८ ते १० दिवस सहज लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सहायक निबंधकांकडे तक्रारी
चावडीवाचनात ज्या शेतकऱ्यांची नावे यादीत आली नाहीत, त्यांनी मंगळवारी सहायक निबंधक कार्यालयात तक्रारी केल्या. यानुसार सहनिबंधक यांनी माहिती घेऊन कार्यवाही सुरू केली. या तक्रारी वाढतच असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात शताब्दी वर्ष पूर्ण केलेल्या भादली (जि. जळगाव) विविध कार्यकारी सोसायटीमध्ये जवळपास ८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते; पण केवळ ६१२ अर्जदारांची नावे यादीत आली, अशी माहिती या सोसायटीचे चेअरमन प्रकाश आनंदाशेठ नारखेडे यांनी दिली.

अशीच स्थिती गणपूर (ता. चोपडा) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतही आहे. तेथे २०० शेतकऱ्यांची नावे यादीतून गायब झाली. याबाबत सुकाणू समितीचे एस. बी. पाटील (ता. चोपडा) यांनी लागलीच सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार केली. तेथून दुरुस्ती करून घेऊ, असे उत्तर मिळाल्याचे पाटील म्हणाले.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...