मुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु
ताज्या घडामोडी
नागपूर : कोरेगाव- भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नाना पटोले यांनी येत्या १२ जानेवारीपासून सुरू होणारी प्रस्तावित पश्चात्ताप यात्रा पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा काँग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे.
नागपूर : कोरेगाव- भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नाना पटोले यांनी येत्या १२ जानेवारीपासून सुरू होणारी प्रस्तावित पश्चात्ताप यात्रा पुढे ढकलली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा काँग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे.
राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून जयंतीनिमित्त येत्या १२ जानेवारीपासून विदर्भात पश्चात्ताप यात्रा पटोले काढणार होते. ही यात्रा शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) साकोली येथे पोचणार होती. ‘‘गेल्या काही दिवसांपासून कोरेगाव- भीमाच्या हिंसाचाराच्या घटना राज्यभर घडू लागल्याने राज्यातील वातावरण योग्य नाही. याकाळात समाजामध्ये शांतता राखण्याची आवश्यकता आहे. अशा अशांत वातावरणात यात्रा काढणे योग्य होणार नसल्याने ही यात्रा पुढे ढकलण्यात येत आहे,’’ असे पटोले यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असल्याने नाना पटोले यांचा काँग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत पटोले यांनी भेट घेतल्याचे पटोले यांनी सांगितले. परंतु, आपण अद्याप काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘‘राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीसंदर्भात माहिती जाणून घेतली. यात काँग्रेस पक्षाची भूमिका काय असावी, याबाबत राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांची मते जाणून घेतली. राज्यातील दलितांच्या हक्कांचे रक्षण करावे, तसेच राज्यातील एकोपा बिघडू नये, यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना राहुल गांधी यांनी दिल्या,’’ अशी माहिती पटोले यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या भेटीच्या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम उपस्थित असल्याचे सांगून, काँग्रेस पक्षात आपण जाणार असलो, तरी एवढ्यात प्रवेश करणार नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.
फडणवीस, पटेल यांना आव्हान
लोकसभेची ही पोटनिवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. सत्तेसाठी मी राजकारण करीत नाही. परंतु, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल राहिल्यास निवडणूक लढून त्यांचे आव्हान घेण्यास मी तयार आहे, असे श्री. पटोले म्हणाले.
- 1 of 143
- ››