agriculture news in marathi, Nana Patole criticizes chief minister on Dharma patil issue | Agrowon

...तर मग मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा : पटोले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नागपूर : शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. रावल सहकारी बॅंकेचे दरोडा प्रकरण दडपणारे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन कसे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

नागपूर : शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी माजी खासदार नाना पटोले यांनी केली आहे. रावल सहकारी बॅंकेचे दरोडा प्रकरण दडपणारे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन कसे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

धर्मा पाटील सरकारी यंत्रणेचे बळी ठरले. त्यांनी काही विशिष्ट व्यक्‍तींनाच जादा मोबदला दिल्याचे सांगून आपल्याला अत्यल्प मोबदला दिल्याचे निदर्शनास आणून दिले. मात्र दखल घेण्यात आली नाही. यामुळे त्यांनी मंत्रालयात विष घेतले. दोंडाई नगरपालिका हद्दीत अमरावती नदीच्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती, इंजिनीनिअर, आरोग्य निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच न्यायालयाने धर्मा पाटील प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे निवेदन धुळे पोलिस अधीक्षकांकडे दिल्याची माहिती पटोले यांनी दिली. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत याचिका दाखल करणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले. या वेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते. 

रावल सहकारी बॅंकेत १५ कोटींच्या दरोडा प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस निरीक्षक प्रदीप पाडवी यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. पथकाने चौकशी अहवालात ५६ लोकांना आरोपी केले. यात मंत्री जयकुमार रावल यांच्यासह आमदाराचाही सहभाग आहे. मात्र कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी सीआयडीकडे नव्याने चौकशी सोपविली. हा प्रकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा आहे, असेही पटोले म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...