agriculture news in Marathi, Nanded 44 Bt seed will be available for 5000 packets | Agrowon

कपाशीच्या नांदेड ४४ बीटी बियाण्याची ५ हजार पाकिटे होणार उपलब्ध
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) या वाणाच्या बियाण्याची ५ हजार ३२५ पाकिटे महाबीजच्या परभणी विभागाअंतर्गतच्या चार जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाच्या १ लाख ८८ हजार ८४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यापैकी आजवर ५० हजार २२२ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या संदर्भात महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी माहिती दिली.

परभणी ः महाबीज आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या संकरित कपाशीच्या नांदेड ४४ बीटी (बीजी २) या वाणाच्या बियाण्याची ५ हजार ३२५ पाकिटे महाबीजच्या परभणी विभागाअंतर्गतच्या चार जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच परभणी विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये खरीप पिकाच्या १ लाख ८८ हजार ८४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा केला जाणार आहे. त्यापैकी आजवर ५० हजार २२२ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. या संदर्भात महाबीजचे विभागीय व्यवस्थापक एस. पी. गायकवाड यांनी माहिती दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण अनेक बाबतीत सरस असल्यामुळे एकेकाळी शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेला कपाशीचा नांदेड ४४ हा वाण अनेक वर्षाच्या संशोधन चाचण्या घेऊन बीटीमध्ये परावर्तित करण्यात आला आहे. महाबीजतर्फे यंदाच्या खरीप हंगामापासून नांदेड ४४ बीटी (बीजी २) वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होणार आहे. मर्यादित प्रमाणात बिजोत्पादन घेण्यात आल्यामुळे यंदा परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील नांदेड ४४ बीटी (बीजी २) या वाणाच्या बियाण्याची ५ हजार ३२५ पाकिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

खरीप हंगामात पेरणीसाठी सोयाबीनच्या (१ लाख ७४ हजार १७० क्विंटल), मुगाच्या (१ हजार क्विंटल), उडिदाच्या (५ हजार २७० क्विंटल), तुरीच्या (४ हजार १०५ क्विंटल), ज्वारीच्या २ हजार ७९ क्विंटल), बाजरीच्या ( ५०० क्विंटल), मक्याच्या (९०० क्विंटल), सुधारित कपाशी (३० क्विंटल), तिळाच्या (३० क्विंटल) असे एकूण १ लाख ८८ हजार ८४ क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबीजच्या परभणी विभागाअंतर्गतच्या परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये केला जाणार आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

कपाशीच्या नांदेड ४४ बीजी २ बीटी बियाणे जिल्हानिहाय पुरवठा (पाकिटे)
जिल्हा बियाणे पाकिटे संख्या
परभणी ७२०
हिंगोली २५
नांदेड ४४४०
लातूर १४०

इतर बातम्या
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
स्टार्च शिजवण्यासह खाण्याचे पहिले...दक्षिण आफ्रिकेतील क्लासीज नदी परिसरातील...
पुणे विभागात तब्बल ९५७ टॅंकरव्दारे...पुणे  : उन्हाचा वाढलेला चटका, भूजलपातळीत...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
‘एफआरपी'साठी शेतकरी संघटना पुन्हा...सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या...
भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन...पुणे : भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाची...
राज्यात आता पीकविमा शेतकरी सहभाग अभियानपुणे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा...