agriculture news in marathi, In the Nanded circle, electricity bill amounted to Rs 44 crores | Agrowon

नांदेड परिमंडळात वीजबिल थकबाकी ४४ कोटींवर
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

नांदेड  : कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकी वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांच्या थकित वीजबिलांची वसुली तसेच वीजपुरवठा खंडीत करण्याची महामोहीम सुरू करण्यात आली आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सप्टेंबर २०१७ अखेर ७ लाख २३ हजार ७९३ वीजग्राहकांकडे ४४ केाटी ३१ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

नांदेड  : कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकी वसुली मोहिमेनंतर आता नांदेड परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांच्या थकित वीजबिलांची वसुली तसेच वीजपुरवठा खंडीत करण्याची महामोहीम सुरू करण्यात आली आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सप्टेंबर २०१७ अखेर ७ लाख २३ हजार ७९३ वीजग्राहकांकडे ४४ केाटी ३१ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व वर्षानुवर्ष थकबाकीचा वाढत जाणारा डोंगर कमी करण्याच्या हेतूने महावितरण प्रशासनाने सर्वच स्तरावर थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची महामोहीम सुरू केली आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड जिल्ह्यामधील ४ लाख २४ हजार २३० वीजग्राहकांकडे ३१ कोटी ५६ लाख रुपये, परभणी जिल्ह्यात १ लाख ८९ हजार १७५ वीजग्राहकांकडे १२ कोटी १८ लाख रुपये तर हिंगोली जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीजग्राहकांकडे ५७ लाख रुपये वीजबिल थकबाकी आहे.

दरम्यान, मंगळवार (ता.७) पासून सुरु झालेल्या या वसुलीच्या महामोहिमेत नांदेड जिल्ह्यातील ३७६ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. १८५१ वीजग्राहकांनी ३५ लाख रुपये वीजबिल भरणा केला आहे. परभणी जिल्ह्यातील ७५ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर ९७ वीजग्राहकांनी ८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल महावितरणच्या खात्यात जमा केले. गेल्या दोन दिवसांत केलेल्या कारवाईत एकूण ४५१ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला, ९ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे.

वीजग्राहकांपर्यंत एक युनिट वीज पोचवण्यासाठी जेवढा खर्च येतो; त्याच्या अर्धीही रक्कम वीजग्राहकाकडून वसूल होत नाही. त्यामुळे वीजग्राहकांनी देय तारखेच्या आत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे अन्यथा वीज खंडीत असे आवाहन नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात २० लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत...
रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरतऔरंगाबाद : वीज रोहित्राबाबत वर्षोगणती ''गरज तुमची...
शेतकऱ्यांची मूग, उडीद खरेदी सुरू...अकोला : नाफेडमार्फत सुरू असलेली मूग, उडीद खरेदीची...
सोलापुरात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीसोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नोकर भरतीत नाशिक जिल्हा बँकेचे संचालक...नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई...नाशिक : राज्यात अवकाळी पाऊस व ओखी वादळामुळे...
‘ऑर्गनाईज कॅपिटल’ आल्यास...औरंगाबाद : शेतीक्षेत्रात खासगी क्षेत्राचा हिस्सा...
‘समृद्धी’बाधितांचे १९ला नागपूर येथे...नाशिक: राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प...
औषधी गुणधर्माचा सुगंधी, चवदार पोक्कली...दक्षिण भारतातील केरळ हे राज्य वैशिष्ट्यपूर्ण अाहे...
लक्षात घ्या आर्द्रता चक्रउपलब्ध पाण्यापैकी आपणास फक्त २५ टक्के पाणी...
कर्बाचे चक्र हा मुख्य कणाकर्ब एका साठ्यातून दुसऱ्या साठ्यात फिरत असतो....
'इस्मा'च्या उपाध्यक्षपदी रोहित पवार...शिर्सुफळ, ता. बारामती, जि, पुणे : इंडियन...
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
डाळिंबाच्या प्रश्‍नापासून सरकारने पळ...निमगाव केतकी, जि. पुणे ः सरकारच्या...
आधार लिंकची मुदत आता ३१ मार्चनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार)...
अंतराळात 'केप्लर-९०आय' हे नवीन सौर मंडळ...नवी दिल्ली: नासाच्या मोठ्या केप्लर डिस्कव्हरी या...
खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि...
अकोला जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने...अकोला : सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी...
कोल्हापूर बाजार समिती करणार बीओटी...कोल्हापूर : कोल्हापूर बाजारसमितीला स्वत: शीतगृह...