नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-२० या वर्षात शेतकऱ्यांना २ हजार ४५९ कोटी ३८ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये खरीप हंगामातील १ हजार ९६७ कोटी ५०४ रुपये आणि रब्बी हंगामातील ४९१ कोटी ८७६ रुपये पीककर्जाचा समावेश आहे. गतवर्षीपेक्षा यंदा पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये ३५५ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली. दरम्यान, २०१८-१९ च्या खरीप आणि रब्बी हंगामात बॅंकांना देण्यात आलेले पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षात विविध बॅंकांना खरीप हंगामामध्ये १ हजार ९६७ कोटी ५०४ रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ५११ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २७७ कोटी १६ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १७८ कोटी ६० लाख रुपये एवढ्या उद्दिष्टाचा समावेश आहे. यंदा खरीप पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टांमध्ये २८४ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

रब्बी हंगामामध्ये यंदा ४९१ कोटी ८७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट बॅंकांना देण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना ३७७ कोटी ९३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला ६९ कोटी २९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ४४ कोटी ६५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये यंदा ७१ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

२०१८-१९ मधील उद्दिष्ट अपूर्णच... २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील बॅंकांना खरीप हंगामात १ हजार ६८३ कोटी ४७ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते; परंतु प्रत्यक्षात ६४३ कोटी ३८ लाख रुपये (३८.२२ टक्के) कर्जवाटप करण्यात आले. खरिपात जिल्हा बॅंकेने उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच १७९ कोटी ६४ लाख रुपये (११७.३५ टक्के) पीककर्ज वाटप केले; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ३२१ कोटी ५२ लाख रुपये (२४.८६) टक्के आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १४२ कोटी २२ लाख रुपये (५९.९७ टक्के) पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात जिल्हा बॅंकेला ३८ कोटी २१ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते; परंतु बॅंकेने कर्ज वाटप केले नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी २१६ कोटी ९३ लाख रुपये (६७ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने ३९ कोटी ७२ लाख रुपये (६७ टक्के) पीककर्ज वाटप केले.

नांदेड जिल्हा २०१९-२० पीककर्ज वाटप उद्दिष्ट (कोटी रुपये)
बॅंक पीक कर्ज
राष्ट्रीयीकृत बॅंका १८८९.३७ 
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक ३४६.४६
जिल्हा सहकारी बॅंक २२३.२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com